Rahul Gandhi-Pushpa Munjiyal | काय सांगता ! होय, 78 वर्षाच्या महिलेनं राहुल गांधींच्या नावे केली संपूर्ण संपत्ती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rahul Gandhi-Pushpa Munjiyal – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) कोणत्या ना कारणाने कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. काहीवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) केलेल्या टाकेमुळे ते ट्रोल झालेलेही पाहायला मिळतात. मात्र आता ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. उत्तराखंडमधील (Uttarakhand) डेहराडूनच्या (Dehradun) एका वृद्ध महिलेने (Pushpa Munjiyal) राहुल गांधींच्या नावावर त्यांची संपत्ती (Property) केली आहे. (Rahul Gandhi-Pushpa Munjiyal)

पुष्पा मुंजियाल असं वृद्ध महिलेचं नाव आहे. पुष्पा यांनी मृत्युपत्र (Death Certificate) डेहराडून न्यायालयात (Dehradun Court) सादर केलं आहे. यामध्ये त्यांनी 50 लाख आणि 10 तोळे या सर्वाचे मालकी हक्क (Ownership) राहुल गांधी यांना दिले आहेत. त्यासोबतच त्यांनी राहुल गांधी यांचं कौतुकही केलं. मी राहुल गांधी यांच्या विचारांना प्रभावित आहे म्हणूनच मी माझी संपत्ती त्यांच्या नावावर केल्याचं सांगितलं. (Rahul Gandhi-Pushpa Munjiyal)

पुष्पा मुंजियाल यांनी यांनी त्यांचे मृत्युपत्र हे माजी प्रदेशाध्यक्ष प्रितम सिंह यांच्याकडे दिल्याची माहिती काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा यांनी सांगितलं. राहुल गांधी यांच्या कुटुंबाने देशासाठी बलिदान असून स्वातंत्र्यलढ्यापासून ते स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशाची प्रगती झाल्याचं पुष्पा मुंजियाल मृत्युपत्र देताना म्हणाल्या.

दरम्यान, राहुल गांधी यांना आपली संपत्ती दिल्यामुळे पुष्पा मुंजियाल चर्चेत आहेत.
यावर राहुल गांधी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title :- Rahul Gandhi-Pushpa Munjiyal | dehradun woman give her all property to congress leader rahul gandhi


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Property Tax | 4 दिवसात 45684 पुणेकरांनी पुणे महापालिकेकडे जमा केला 45.88 कोटी रूपये मिळकत कर

Common Health Problems During Summers | उन्हाळ्यातील ‘या’ 5 आरोग्य समस्यांची जाणून घ्या लक्षणं

Devendra Fadnavis – Raj Thackeray | मनसे-भाजपचं होणार मनोमिलन ?; नितीन गडकरींनंतर फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट !

Devendra Fadnavis – Raj Thackeray | मनसे-भाजपचं होणार मनोमिलन ?; नितीन गडकरींनंतर फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट !

Chhagan Bhujbal On Raj Thackeray | राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले – ‘भाजपाविरोधात बोलता बोलता कोहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला’

Chitra Wagh-Satej Patil | चित्रा वाघ यांचा सतेज पाटलांना सवाल; म्हणाल्या – ‘मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?’