ज्योतिरादित्यांना तुम्ही भेटला नाहीत ? राहुल गांधी म्हणाले – ‘एकमेव मित्र जो कधीही थेट घरी येऊ शकत होता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकेकाळी ते काॅंग्रेसमधील ‘लंबी रेसका घोडा’ मानले जात असत. ते राहुल गांधींच्या जवळच्या लोकांपैकी एक होते. अशाप्रकारे पक्ष सोडल्यावर आतापर्यंत काॅंग्रेस हाय कमांडने कोणतेही मोठे विधान दिले नव्हते. आता राहुल गांधींनी प्रथमच या विषयावरील मौन सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की ज्योतिरादित्य हे एकमेव मित्र आहेत जे कधीही घरी येऊ शकतात. राहुल म्हणाले की, ते आधीही येऊ शकत होते.

खरं तर, जेव्हा पत्रकारांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारला की, सिंधिया गटाकडून असा आरोप आहे की, त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा होती, पण तुम्ही त्यांना भेटू शकला नाहीत. यावर राहुल उत्तर देताना म्हणाले, ज्योतिरादित्य आणि मी एकत्र अभ्यास केला आहे. तसेच ज्योतिरादित्य हे एकमेव मित्र आहेत जे कधीही घरी येऊ शकतात. तर बुधवारी राहुल गांधी यांनी आरोप केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्वाचित सरकार हटवण्याचा कट रचला आहे.

आज (बुधवारी) काॅंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया भारतीय जनता पक्षात दाखल झाले. सिंधिया यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात भाजपचे सदस्यत्व घेतले. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर सिंधिया यांनी काॅंग्रेस सोडल्याचे दुःख व्यक्त केले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. सिंधिया म्हणाले की, मला नड्डाजी यांचे आभार मानायला आवडेल की त्यांनी मला त्यांच्या कुटुंबात बोलावले आणि जागा दिली.

या दरम्यान सिंधिया यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, काॅंग्रेस पक्ष पहिल्यासारखा नाही राहिला. ते म्हणाले की, नवीन नेतृत्वाला मान्यता मिळत नाही, काॅंग्रेसमध्ये राहून देशाची सेवा करता येणार नाही. मध्य प्रदेशातील शेतकरी व्यथित आहे, तरुण असहाय्य आहे. रोजगार कमी झाला आणि भ्रष्टाचार वाढला आहे.