राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर स्मृती इराणी म्हणाल्या ‘जय श्रीराम’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांना विचारले असता त्यांनी फक्त ‘जय श्रीराम’ असे म्हणून निघून गेल्या. तर भाजपाच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर खोचक टीका केल्या आहेत.

ट्विटरवरून राहुल गांधींचा राजीनामा

राहुल गांधी यांनी ट्विटरवरून आपला राजीनामा दिला असल्याची माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या पराभवाची मी जबाबादारी घेत आहे. याच कारणामुळे मी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.

‘जय श्रीराम’ म्हणत स्मृती इराणी निघून गेल्या

राहुल गांधी यांच्या राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या अमेठीच्या खासदार स्मृती इरानी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फक्त ‘जय श्रीराम’ म्हणून त्या निघून गेल्या. लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांचा पराभव केला आहे. स्मृती इरानी यांनी राहुल गांधी यांचा ५० हजार मतांनी पराभव केला असून अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

मोदी सरकारला धक्का, बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर

मदरशातील मुलींवर लैंगिक अत्याचार, व्यवस्थापकासह तिघांना अटक