‘हमारा नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’ तरी देखील राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने समजूत घातल्यानंतर देखील त्यांनी आपला राजीनामा देण्याचे मनाशी पक्के केले आहे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी अनेक नावे पुढे येत आहेत. याचदरम्यान काल काँग्रेसची एक बैठक पार पडली . यावेळी पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

यावेळी पक्षाच्या ५१ खासदारांनी राहुल यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. तसेच युवक काँग्रेसच्या सदस्यांनी राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी करत राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला आहे. तसेच ‘देशाला राहुल गांधींची गरज आहे’ असे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी राहुल गांधीना अध्यक्षपदी कायम राहण्याची मागणी केली. मात्र राहुल यांनी राजीनामा मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केल आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत दुसरा पर्याय निवडण्याचा सल्ला दिला.

यादरम्यान ते एक महिन्यासाठी अध्यक्षपदावर राहतील, मात्र लवकरात लवकर त्यांनी यासाठी नवीन पर्याय शोधण्याची विनंती पक्षाला केली आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते त्याचप्रमाणे सोनिया गांधी आणि आणि प्रियांका गांधी यांनी देखील राहुल यांना विनंती केली आहे. मत राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेत काँग्रेस पक्षाची वाताहत झाली होती. ३०३ जागांसह भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता तर काँग्रेसला ५२ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी राजीनामा देण्यावर ठाम असल्याचे म्हटल्यानंतर काँग्रेस पक्षाने या पदासाठी अनेक जेष्ठ नेत्यांची नवे समोर येत आहेत. यामध्ये सुशील कुमार शिंदे, मल्लिकार्जुन खर्गे, डॉ. मनमोहन सिंह, अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्या नावाचा समावेश होता.
आरोग्य विषयक वृत्त –
फेसबुक पोस्टवरून समजणार तुम्ही कोणत्या आजाराशी झगडताय !
वजन घटवायचंय… मग शांत झोप घ्या !
‘नाईट क्रीम’ ठेवते त्वचेला तजेलदार आणि तरुण
या ‘मार्गांचा’ अवलंब करा आयुष्यात व्हाल यशस्वी