काय सांगता ! होय, संजय राऊतांच्या वक्तव्याचं भाजप नेत्यांकडून स्वागत, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विरोध करणाऱ्यांवर केलेल्या वक्तव्याचे सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी स्वागत केले आहे. ‘ भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना दोन दिवसांसाठी अंदमानच्या तुरुंगात डांबायला हवे, असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्याचे रणजीत सावरकर यांच्याबरोबरच भाजप नेते विनोद तावडे यांनी देखील समर्थन केले आहे. ‘खासदार राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे आपण स्वागत करत असून त्यांनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनाच अंदमानातील तुरुंगात पाठवावे लागेल, असे तावडे यांनी म्हंटले आहे.

तावडे पुढे म्हणाले कि, ‘गेल्या काही दिवसांपासून खासदार राऊत हे काही वक्तव्ये करत आहेत. मात्र, आजच्या त्यांच्या वक्तव्याला पाठिंबा द्यायलाच हवा. त्याने सूचविलेल्या प्रमाणे सावरकर विरोधकांना जर अंदमानातील तुरुंगात पाठवायचे झाल्यास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाच प्रथम पाठवायला हवे. मात्र, खासदार राऊत यांनी हे काँग्रेस पक्षाला समजावून सांगणे गरजेचे आहे, असेही तावडे यावेळी म्हणाले. तसेच खासदार राऊत यांनी हे वक्तव्य का केले हे पाहायला हवे. या अगोदर त्यांनी केलेल्या वक्तव्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले का? असा सवालही तावडे यांनी उपस्थित केला.

सोबतच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी संजय राऊत यांचे वक्तव्य योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. खरे तर राऊत यांनी राहुल गांधी यांनाच सल्ला दिला आहे. कारण राहुल गांधी जे काही बोलतात त्याचीच री काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्ते ओढत असतात. खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना अंदमानला पाठवण्याबाबतचे विधान करून धाडस दाखवले आहे. त्यांच्या वक्तव्यातून बरेच काही सूचित होते, असे मत त्यांनी यावेळी मांडले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/