राहुल गांधींनी मराठी शिकून घ्यावं

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

मी पंतप्रधान मोदीजी, भाजप किंवा 15 लाखांबबात काहीच बोललो नव्हतो. ज्या कार्यक्रमात मी बोललो होतो तो कार्यक्रम मराठी होता. मला आश्चर्य वाटतं, की राहुल गांधींना मराठी कधीपासून कळायला लागलं. त्यांनी मराठी शिकून घ्यावं, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2e6d4f2-cc8a-11e8-a21f-7349619594d2′]

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सल पाहुणे, इरसाल नमुने’ या कार्यक्रमात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली होती. यावेळी नितीन गडकरी यांनी ‘आम्ही सत्तेत येणार नाही याची खात्री होती. त्यामुळे आम्ही आश्वासन देत सुटलो. आता आम्हीच त्या आश्वासनांवर हसतो आणि पुढे जातो’, असा खुलासा केला होता.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गडकरींचा हा व्हिडिओ ट्विट करत टीका केली होती. ‘भाजपाने जनतेच्या स्वप्नांचा आणि विश्वासाचा सत्तेच्या हव्यासापोटी बळी दिला आहे’ असं त्यांनी म्हटलं होतं. यावर नितीन गडकरी यांनी खुलासा दिला आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab8bd08f-cc8a-11e8-bc82-17d435a4d16c’]

दिल्लीतील एका इंग्रजी वृत्तपत्राने पूर्ण निराधार वृत्त छापलं. त्यावेळी मी ना मोदींचं, ना भाजपाचं नाव घेतलं, ना मी 15 लाखांचा उल्लेख केला. त्यांनी ही बातमी छापल्यानंतर राहुल गांधींनी ती शेअर केली. असं गडकरी म्हणाले.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b65d2250-cc8a-11e8-a89a-3fdb01d68c0b’]

मी दिलेली आश्वासनं पूर्ण करतो आणि ती केली आहेत. कार्यक्रमात जो टोलचा उल्लेख झाला ते आश्वासनही महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलं आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. ना तिथे मोदींचं नाव होतं, ना भारत सरकार, ना 15 लाखांचा उल्लेख होता. कृपया तुम्ही चुकीच्या बातम्यांनी प्रभावित होऊ नका, असेही गडकरी म्हणाले.