‘लॉकडाऊन फेल झालं’, राहुल गांधींकडून स्पेन, जर्मनीसह भारताच्या आलेखाचं ‘ट्विट’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या 21 दिवसांच्या लॉकडाउननंतर तब्बल चार वेळा त्याला मुदतवाढ देण्यात आली. आता केंद्र सरकारने लॉकडाउन शिथिल करण्यसा सुरूवात केली असून, हा लॉकडाउन फेल (अयशस्वी) झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचा आलेख शेअर करत हा दावा केला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी याविषयावर भूमिका मांडत आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयावरही त्यांनी सुरूवातीपासून केंद्राला काही सूचना केल्या होत्या. केंद्राने लागू केलेला लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका केली होती. जगातील इतर राष्ट्रांमध्ये लॉकडाउन हटवताना कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. तर भारतात उलट चित्र आहे, असे ते म्हणाले होते. गांधी यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचा आलेख ट्विट केला आहे.

या राष्ट्रांमध्ये संख्या वाढत असताना लॉकडाउन लागू करण्यात आला. मात्रा, लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर संख्या कमी होताना दिसत आहे. भारतात रुग्णांची संख्या वाढत असताना लॉकडाउन हटवण्यात आला आहे. आलेखांबरोबर राहुल गांधी यांनी हे अपयशी झालेल्या लॉकडाउनसारखे दिसत आहे, असे म्हटले आहे. लॉकडाउन विषाणूला थांबवू शकत नाही. लॉकडाउन पॉझ बटनासारखा आहे. कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या तरच आपण लढू शकतो. कोरोनामुळे देशात आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली असून बेरोजगारीही वाढू लागली आहे, अशी टीका गांधी यांनी केली.