सत्तेसाठी पंतप्रधानांनी ‘बलवान’ असल्याची खोटी प्रतिमा तयार केली : राहूल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सत्तेत येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलवान असल्याची खोटी प्रतिमा तयार केली. ही त्यांची जमेची बाजू होती. पण, हीच बाब भारतासाठी कुमकुपणा ठरत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. भारत-चीन सीमावादावरून त्यांनी मोदींवर पुन्हा टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यामध्ये भारत-चीन सीमावादाबरोबर पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेवर टीका केली आहे. हा सर्वसाधारण सीमावाद नाही. माझ्यासाठी चिंतेची बाब ही आहे की चीन आपल्या हद्दीत येऊन बसला आहे. रणनीतीशिवाय चीन कोणतेही पाऊल उचलत नाही. त्यांच्या डोक्यात नकाशा तयार झालेला आहे. ते आता स्वतःच्या मनाप्रमाणे त्याला आकार देत आहेत. जे त्यांना हवय तेच ते करत आहेत. त्यामध्येच ग्वादर, बेल्ट एंड रोडचा समावेश आहे.

हे एकप्रकारे ग्रहाची पुर्नरचनाच आहे. त्यामुळे जेव्हा आपण चीनविषयी विचार करतो, तेव्हा आपल्याला हे समजून घ्याव लागेलं की चीन कशापद्धतीनेविचार करतोय, असे गांधी म्हणाले. आता आपण मुत्सद्दी पातळीवर विचार केला, तर चीन आपली बाजू मजबूत करत आहे. मग ते गलवान असो, डेमचोक असो की, पॅगाँग व्हॅली, मजबूत स्थिती तयार करायची हा त्यांचा निर्धार पक्का आहे. ते आपले महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. जर ते काही मोठा विचार करत आहेत, तर ते काहीतरी करू इच्छित आहेत. नरेंद्र मोदी यांना 56 इंची प्रतिमेला कायम ठेवावे लागणार आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.