राहुल गांधींनी Twitter वर अनेक नेत्यांना-पत्रकारांना केलं Unfollow, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी (दि. 1) अचानक अनेक नेत्यांना आणि पत्रकारांना ट्विटरवर Twitter अनफॉलो Unfollow केले आहे. यात त्यांच्या पक्षाचे अनेक नेते, पत्रकार आणि काही जवळच्या लोकांचा समावेश आहे. एढेच नाही, तर कार्यालयात काम करणारे काही लोक आणि दिल्लीत काम करणाऱ्या काही वरिष्ठ पत्रकारांचाही यात समावेश आहे. राहुल गांधींच्या या अ‍ॅक्शनची सोशल मिडिया आणि राजकीय वर्तुळात सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे.

Pune : चॅटींग अ‍ॅपद्वारे ओळख करुन तरुणाला लुटणारे अटकेत; कोंढवा पोलिसांची कामगिरी

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही एक एक्सरसाइज आहे. राहुल गांधींचे अकाउंट रिफ्रेश केले जात आहे. लवकरच काही लोकांची यादी तयार होईल. ज्यांना राहुल गांधी ट्विटरवर Twitter फॉलो करतील. यात आता अनफॉलो Unfollow केलेल्या लोकांचाही समावेश असणार आहे. दरम्यान काँग्रेसकडून काहीही स्पष्टीकरण दिले जात असले तरी राहुल गांधींच्या या अ‍ॅक्शनमुळे चर्चेला उधान आले आहे. याकडे राहुल गांधींच्या भविष्यातील रणनीतीच्या तयारीच्या दृष्टीनेही बघितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी ट्विटरवर Twitter जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह आणि आक्रमक आहेत. राहुल यांनी नुकताच कोविडला मोविड, म्हणत पंतप्रधानांवर थेट हल्ला चढवला होता. भाजप नेत्यांनी यावर आक्षेपही नोंदवला. मात्र, राहुल गांधी यावर म्हटले होते, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला केवळ नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. त्यामुळे कोविडचे मोविड असे केल्याचे ते म्हणाले.

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !