राहुल गांधीच्या उपहासाचा न्यूज चॅनेलने लावला उलटा अर्थ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेचा मोरक्या मसूद अजहर याला भाजपच्या सरकारने अगदी आदराने कंदाहारला नेऊन सोडले होते, असा उपहास करताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्याचा उल्लेख ‘मसूद अजहरजी’ असा केला. एक मोठा स्कुप मिळाल्याच्या नादात न्युज चॅनेलने आपल्या सोयीनुसार चुकीचा अर्थ लावून सोमवारी रात्रीपासून एकच हल्लाबोल सुरु केला आहे. न्युज चॅनेलच्या हल्लाबोलचा फायदा उठविण्याची संधी भाजपने साधली आहे. दरम्यान, राहुल गांधींवर कटचा डाव असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

नवी दिल्लीतील बुथ काँग्रेस कार्यकर्त्यांशी बोलताना हा प्रकार घडला होता. मात्र, भाजपने केवळ त्यातील ७ सेकंदाचा एडिट व्हिडिओ आपल्या अधिकृत टवीटर अकाऊंटवर टाकला. त्याला लाईक करीत भाजपच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी तो रिट्वीट केला. पण आता राहुल गांधी यांचा संपूर्ण भाषण समोर आल्यानंतर हे नेते तोंडघशी पडले आहेत.  राहुल गांधी म्हणाले, पुलवामामध्ये हल्ला झाला. आमचे ४४ जवान मारले गेले. हा हल्ला कोणी केला जैश ए महम्मदच्या मसूद अजहर. आता हे ५६ इंच छातीवाले तुम्हाला आठवत असेल, याचे पूर्वीचे सरकार होते. त्यांनी ‘मसूद अजहरजी’ ला एका विमानात घेऊन कंदाहारला नेले.

त्यानंतरही एकदा राहुल गांधी यांनी त्याचा उल्लेख मसूद अजहर असा केला आहे. मात्र, न्युज चॅनेलने राहुल गांधी यांचे ते वक्तव्य पुढील मागील संदर्भ लक्षात न घेता व सुरुवातीलाही ते मसूद अजहर म्हणाले होते. हे लक्षात न घेता व त्यातील उपहाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन त्यांचे केवळ ‘मसूद अजहरजी’ हे एकच वाक्य वारंवार दाखविण्यास सुरुवात केली.

न्युज चॅनेलच्या या हल्लाबोलवर राहुल गांधी यांना लक्ष्य करण्याची मिळालेली संधी भाजपने सोडली नाही. भाजपच्या अधिकृत टिटर हँडलवरुन राहुल गांधी यांचा वक्तव्यातील तेवढेच वाक्याचा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये भाजपने म्हटले आहे की, ४४ भारतीय जवानांना मारणाऱ्या या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याबाबत राहुल गांधी यांच्या मनात आदर आहे. असे म्हणत टिका करण्याची संधी साधली. या गदारोळावर काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

राहुल गांधी चा अवघ्या ७ सेंकदाचा हा व्हिडिओ भाजपने टिष्ट्वट करुन गैरवापर करीत असल्याचे दिसून आले आहे. मनसेने आपल्या अधिकृत टिटरही भाजपच्या या गलिच्छ राजकारणाचा व्हिडिओ शेअर करणारे महाभाग नेते तोंडघशी पडले असे म्हटले आहे.