राहुल गांधी ‘या’ दोन मतदार संघातून निवडणूक लढवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा चालू होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. राहुल गांधी अमेठीसह केरळमधील काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या वायनाड मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. याबाबतची काँग्रेसने आज अधिकृत घोषणा केली आहे. मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांनी दिली.

राहुल यांनी वायनाडमधून निवडणूक लढवावी यासाठी एक महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच दक्षिण भारतातील केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी सध्या लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, २००४ पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. अमेठीतून राहुल यांच्यासमोर भाजप नेत्या आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचे आव्हान असणार आहे.

लोकसभेची फेररचना झाल्यानंतर २००८ पासून वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. या २००८ पासून या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे.