‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावरून माफी मागणार नाही : राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंड येथील रॅलीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी टीका करताना मेक इन इंडिया ऐवजी रेप इन इंडिया झाला असल्याचे विधान केले होते या विधानाला लोकसभेत भाजपच्या खासदारांनी जोरदार विरोध केला आणि यासाठी राहुल गांधींवर कारवाई करण्याची मागणी देखील केली. त्यानंतर बोलताना राहुल गांधी यांनी भाजप खासदार हे नागरिकत्व विधेयकामुळे जी आग लागलेली आहे त्यावरून लक्ष हटवण्यासाठी सभागृहात गोंधळ करत असल्याचे म्हंटले आहे.

भाजपच्या आमदाराने ज्या वेळी बलात्कार केला त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक शब्दही काढला नसल्याचा आरोप देखील यावेळी राहुल गांधी यांनी केला तसेच केलेल्या वक्तव्यांबद्दल माफी मागणार नसल्याचे सांगत मोदी आणि शहा यांनी भारताच्या ईशान्य भागात जी आग लावली आहे त्यावरून लक्ष हटवण्यासाठी भाजप खासदार प्रयत्न करत असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले.

जगात भारताची प्रतिमा खराब केली
एकेकाळी जगात भारताची प्रतिमा ही सुसंस्कृत आणि शांतीप्रिय देश अशी होती मात्र काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर केवळ भारतात होणाऱ्या हिंसेची चर्चा होते तर बलात्कारामुळे देशाचे वातावरण खराब झालेले आहे. एकूणच मोदी सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीववर भारताची प्रतिमा खराब झाल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like