लोकशाही भाजपला निराश करते – राहुल गांधी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल करारावर गोव्यात झालेल्या प्रकरणात आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. गोव्यात निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विरोध केला म्हणून भाजप हल्ला करते. कारण भाजपला लोकशाही निराश करते असा बारीक चिमटा भाजपला राहुल गांधी यांनी काढला आहे. आपले हे वक्तव्य त्यांनी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले असून त्यांच्या वक्तव्यावरून भाजप त्यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे.

राफेल करारावर भाजपला काँग्रेस बदनाम करत आहे. याच मुद्यावर भाजप प्रदेश समितीच्या वतीने पणजीच्या काँग्रेस भवनवर मोर्चा काढला. त्यानंतर काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यात बाचाबाची होऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण करण्यात आली. याच प्रकरणात भाजपच्या विरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेत भाजपवर टीका केली आहे. भाजपला लोकशाही आवडत नाही म्हणून भाजप गुंडगीरी करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यानावर दबाव आणण्याचा प्रयत्न करते आहे. राहुल गांधी यांनी फेसुबकच्या माध्यमातून दोन फोटो पोस्ट केले असून भाजप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कसा जुलूम करते आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे. त्यांनी गांधीगिरीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे कि आपण कोण आहोत. त्या कार्यकर्त्यांच्या धाडसाचा साहसाचा मला अभिमान आहे असे राहुल गांधी यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणले आहे. तर काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या भाजप यंत्रणेला मोदींनी चांगला सल्ला देण्याची आवश्यकता आहे असे म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे.

तर काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष  अस्मिता कुतिन्हो यांनी आपल्या पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत भाजप वर टीका केली असून भाजप सरकार राज्यात ‘गुंडा राज’ राभवत असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हणत  भाजपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.  पणजी मध्ये झालेला बाचाबाचीचा मद्दा आता राष्ट्रीय मुद्दा बनला असून भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांकडून हि या मुद्द्यावर वक्तव्य व्यक्त केली जाण्याची शक्यता आहे.