राहुल गांधी यांच्या जीवनावर येतोय बायोपिक ; ट्रेलर झाला प्रदर्शित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारताच्या सिने जगतात सध्या चित्रपटांच्या जगतात बायोपिक काढण्याची चढाओढच सुरु झाली आहे. भाग मिल्का भाग, मेरी कॉम पासून सुरु झालेला हा बायोपिकचा प्रवास, गुरु, दंगल, सुलतान, ‘पॅडमॅन’, ‘ठाकरे’, ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या बायोपिक पर्यंत येऊन थांबला असताना मणिकर्णिका सारखा दर्जेदार बायोपिक प्रेक्षकांना मंत्रमुग्द करून गेला. नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या बायोपिकची शूटिंग सुरु असतानाच राहुल गांधी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्या चित्रपटाचे नाव ‘माय नेम इज रा गा’ असे असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

राहुल गांधी याचे आयुष्य त्यांच्या आज्जी इंदिरा गांधी जिवंत असताना किती सुखदायी होते. त्यानंतर त्यांच्या आज्जीची त्यांच्या दारात गोळ्या झाडून कशी हत्या करण्यात आली याचे सचित्र दर्शन आपणाला या चित्रपटात पाहण्यास मिळणार आहे. त्याच प्रमाणे राजीव गांधी यांना इंदिरा गांधी याच्या हत्येनंतर राहुल गांधी कशा प्रकारे प्रश्न विचारता ते हि या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. बाबा तुम्ही हि असेच मारले जाणार का असा प्रश्न राहुल गांधी विचारतात तेव्हा ट्रेलर बघणारा प्रत्येक व्यक्ती भाहुक झाल्या शिवाय राहत नाही.

या चित्रपटात इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी मनमोहन सिंग यांची व्यक्तिचित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे मोदी यांच्या व्यक्तिमत्वासमोर राहुल गांधी आपले व्यक्तिमत्व कसे तयार करतात हे देखील या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. एवढे सगळे असताना राहुल गांधी यांच्या डोळा मारण्याच्या शैलीला सुद्धा चित्रपटात स्थान देण्यात आले आहे. दिग्दर्शन रुपेश पॉल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मात्र अदयाप स्पष्ट करण्यात आली नाही.

https://youtu.be/XxiEqDRZdTU