…राहुल गांधीच्या सभेतही मैदान रिकामे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राहुल गांधी यांनी नागपूरात काँग्रेस चे उमेदवार नाना पटोले यांचा प्रचार करण्यासाठी आज कस्तूरचंद पार्क या मैदानावर सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी भाजप सरकारसह मोदींच्या आश्वासनांवर जोरदार हल्लाबोल चढवला. मात्र, त्यांच्या याच सभेला पुरेशी गर्दी झालेली नाही. तसेच मैदानाची मागिल बाजू रिकामी दिसत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांची आज नागपूरच्या कस्तूरचंद पार्क येथे भव्य सभा घेण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसचे नाना पटोले हे निवडणूक मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली. मात्र, मैदान संपूर्ण भरलेलं नाही, त्यातील मागिल बाजूला मैदान रिकामं दिसत होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा वर्धा येथे झाली होती. त्यावेळी सभेला अपेक्षित गर्दी झाली नव्हती. तसेच त्या मैदानातील मागिल बाजू रिकामी होती. त्याचे फोटो विरोधी पक्षांनी सोशल मीडियावर शेअर करत भाजपवर जोरदार टिका केली होती. त्या फोटोवरून आता मोदींची लाट ओसरली असून त्यांच्या सभेला लोक येत नाहीत अशी टिका काँग्रेस सह राष्ट्रवादीने केली होती.

You might also like