राहुल गांधींच्या नागपूर सभेचे ‘ते’ फोटो तीन वर्षे जुने

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची गुरुवारी झालेल्या सभेचे फोटो म्हणून जे फोटो व्हायरल केले ते चक्क तीन वर्षांपूर्वीचे असल्याचे उघड झाले आहे.

गुरुवारी नागपूरात पाऊस झाला. त्यामुळे सभेला फारशी गर्दी नव्हती. मात्र, त्याच रात्री काँग्रेस नेत्यांनी सभेला प्रचंड गर्दी झाल्याचे फोटो व्हायरल करण्यात येऊ लागले. त्यामुळे राज्यात सर्वत्र चर्चेला सुरु झाली. दरम्यान, या फोटोची तपासणी करण्यात आल्यावर तेव्हा काँग्रेस नेत्यांनी ट्विट केलेले फोटो राहुल गांधी यांच्या सभेचेच होते. मात्र, ते फोटो तब्बल तीन वर्षे जुने ११ एप्रिल २०१६ रोजी कस्तुरचंद पार्कमधील सभेचे होते.

मात्र, हे सत्य उघड झाल्यानंतरही युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नागपूरमधील सभेनंतर दुसरे छायाचित्र ट्विट केले आणि सवाल विचारला एक लाख लोक पुरेसे नाहीत का?, नागपूरात पाऊस पडूनही एवढी गर्दी!