राहूल गांधींचं भाषण मनोरंजनासाठी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – राहूल गांधी काय खाऊन गरिबी हटवणार ते मात्र सांगत नाहीत. राहुल गांधींचं भाषण मनोरंजन आहे. हे भाषण मनोरंजनासाठी आहे अशी टीप टीव्ही मालिकेत येणाऱ्या टिप सारखी त्यांच्या भाषणाआधी येईल. असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरुड येथील प्रचार सभेत केले.

मोदी सरकारने जनतेला खुप काही दिलं. ३४ कोटी गरिबांना बँकेत खाते उघडून दिले. ८० हजार कोटी थेट खात्यात जमा केले. दिल्लीचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आला. लातुरात १ लोकांपेक्षा जास्त उज्वला गॅस वाटप केले. १० वर्षात ५२ हजार कोटी रुपये दिले. मात्र मोदीजी ७५ हजार कोटी रुपये देत आहेत. ज्याला विमा मिळाला नाही त्यांना ही विमा मिळणार. जर सरकार आलं तर जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांना पेन्शन देणारे पहिला देश भारत असेल. असा मोदी सरकारच्या योजनांचा पाढा त्यांनी वाचला.

त्यासोबतच मराठवाड्यात आता वॉटर ग्रीड ची निर्मीती आम्ही करणार आहोत. ५० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणायचं आहे. ५० वर्षात एकही कारखाना विरोधकांनी आणला नाही. कोणी रावणगिरी केली तर मतदानाच्या रुपात तुम्ही त्याला उत्तर द्यावे असे आव्हान त्यांनी केलं.