राहुल कलाटे यांनी साधला सर्व भागात नागरिकांशी संवाद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राहुल कलाटे यांनी आज वाकडसह चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाकडसह विविध परिसरात रॅली काढून नागरिकांशी संवाद साधला. रॅलीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिला भगिनींनी कलाटे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

या रॅलीमध्ये सर्वपक्षीय नेते, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीला वाकड येथून सुरुवात झाली. भूमकरवस्ती, भूमकर चौक, विनोदेनगर, धर्मवीर संभाजी महाराज चौक, जाधव कॉर्नर, काळाखडक, स्वामी विवेकानंद नगर, सम्राट चौक वाकड, कलाटेनगर, मनोहर पार्क, पिंक सिटी, वेणूनगर, साई चौक, शेंडगे पार्क, सानोबा चौक वाकड, पलश हौसिंग सोसायटी, साईनाथ कॉलनी, राधाकृष्ण कॉलनी, दत्त मंदिर रोड, माऊली चौक वाकड, माता रमाबाई आंबेडकर चौक, गीता सोसायटी, भाऊसाहेब कलाटे नगर, शेख चौक, निसर्गदीप कॉलनी, जय भवानीनगर शेंडगे वस्ती, दक्षता नगर, मानकरवस्ती, साई मंदि हिंद चौक, इंगवले चौक तसेच संस्कृती सोसायटी परिसरातून रॅली काढण्यात आली.

रॅलीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्‍यांची आतषबाजी, नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे मिळणारा प्रतिसाद यामुळे रॅलीमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. माता भगीनींनी यावेळी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान कलाटे यांनी नागरिकांशी संवाद साधत चिंचवडच्या विकासाचे अभिवचन दिले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like