आपली ‘औकात’ आपल्या ‘चौकात’च ‘राजकारण’ म्हणत मंत्री महादेव जानकारांकडून दौंडसह १५ जागांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दौंडची जागा रासपच्या हक्काची जागा असून नैसर्गिक न्यायाने ही जागा आमचीच असल्याचे पशुसंवर्धन मंत्री आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले. दौंडच्या जागेवर हक्क सांगत जानकर यांनी राज्यात विधानसभेच्या १५ जागांची मागणी केली आहे. राज्यातील माढा, अहमदपूर, भूम, कळबोली, परांडा, माण खटाव, पंढरपूर आणि फलटण या जागांसह १५ जागांची मागणी जानकर यांनी केली आहे. या मतदार संघामध्ये रासपचा प्रभाव असल्याने या जागा रासपला देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

दौंडचे आमदार राहुल कुल हे भाजपकडून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये होती. अखेर दौंडची जागा रासपकडेच राहिल असेल महादेव जानकर यांनी स्पष्ट केल्याने राहुल कुल भाजपाकडून निवडणूक लढवणार असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता राहुल कुल यांना रासपतर्फे निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

महादेव जानकर हे दौंड तालुक्यातील चौफुला येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि रासप यांची महायुती असणार आहे. मागील निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्ष महायुतीमध्ये होता. त्यावेळी त्यांना ९ जागा दिल्या होत्या. मात्र, आता स्वाभिमानी महायुतीमध्ये नसल्याने त्या जागा रासप आणि आरपीआयला द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली.

आपली औकात आपल्या चौकात
मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीने रासपला ६, आरपीआयला ३ आणि स्वाभिमानीला ९ जागा दिल्या होत्या. या निवडणुकीत रासपने १ जागा जिंकून इतर जागांवर समाधानकारक मते मिळवली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे रासपला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगीतले. यंदाच्या निवडणुकीत महायुतीने रासपला १५ जागा द्याव्यात अगर १५ जागा नाही दिल्या तर दुसरा विचार रासप करणार नाही. आम्हाला आमची क्षमता माहित आहे. आपली औकात आपल्या चौकात या न्यायाने राजकारण केले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’