दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल पुन्हा विजयी, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड विधानसभा निवडणुकीच्या चुरशीच्या लढतीत भाजपाचे उमेदवार व विद्यमान आमदार राहुल कुल पुन्हा विजयी झाले आहेत. या विधानसभा मतदार संघाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या मतदार संघात राहुल कुल यांनी रासपाची साथ सोडत भाजपाची उमेदवारी घेतली होती. त्यामुळे निकालाबाबत प्रचंड उत्स्तुकता होती. निवडणुक जाहीर झाल्यानंतर राहुल कुल यांनी राष्ट्रवादीच्या दिग्गजांना भाजपात घेत निवडणुक एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला होता.
Daund
दौंड विधानसभा निवडणुकीत दौंड तालुक्यातील 2 लाख 12 हजार 467 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. वाढलेल्या मतदानामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मतमोजणीला गुरूवार (दि.24) रोजी सकाळी साडेआठ वाजता सुरूवात करण्यात आली. पहिल्या फेरीत राहुल कुल यांनी घरच्या मैदानात अपेक्षेप्रमाणे 4650 ची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत राहुल कुल यांची मताची आघाडी एकुण 7852 मतांनी कुल आघाडीवर राहिले. चौथ्या फेरीत ही आघाडी वाढुन 8184 मते झाली. पाचव्या फेरीत कुलांची आघाडी कमी होत 6343 एवढी झाली. त्यानंतर राहुल कुल यांची आघाडी कमी होत ती 20 व्या फेरीपर्यत अवघी 525 मतांची आघाडी राहिली. कुलांची होणारी पिछेहाट पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह पाहण्यास मिळाला. त्यातच निवडणुक निर्णयक अधिकाऱ्यांनी
जेवणासाठी अर्धा तास विश्रांती घेतल्याने दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांनी आपले नेते विजयी झाल्याचे घोषीत करत आनंदोस्तव साजरा केला.

त्यातच जेवणाची वेळ संपल्यानंतर अधिकाऱ्यांनी पोस्टल मते मोडणीस घातली. त्यामध्ये देखील जास्त वेळ गेल्याने सर्वामध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अर्धा तासानंतर पोस्टल मोजणीत कुल यांना 73 मते जास्त मिळाल्याने कुलांना 598 मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर झालेल्या 21 व्या फेरीत कुल यांची 39 मतांनी पिछेहाट झाली. परंतु अखेरच्या 22 व्या फेरीत कुल यांना निर्णायक 4501 व रमेश थोरात यांना 4314 मते मिळाली. या चुरशीच्या लढतीत 746 मतांनी कुल विजयी झाल्याचे निवडणुक निर्णायक अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी जाहिर केले.

उमेदवाराचे नाव (कंसात पक्ष) – मिळालेली मते
1) किसन बबन हंडाळ (बसपा) – 934
2) रमेश किसनराव थोरात (राष्ट्रवादी) – 102918
3) राहुल सुभाष कुल (भाजपा) – 103664
4) अशोक किसन होले  (बहुजन मुक्ती) – 800
5) तात्यासो नामदेव ताम्हाणे (वंचित) – 2598
6) रमेश शिवाजी शितोळे (प्रहार) – 417
7) उमेश महादेव म्हेत्रे (अपक्ष) – 113
8) प्रतिक नंदकिशोर धानोरकर (अपक्ष) – 76
9) प्रल्हाद दगडु महाडिक (अपक्ष) – 136
10) महमद जमिर शेख (अपक्ष) – 251
11) रमेश किसन थोरात (अपक्ष) – 461
12) लक्ष्मण नरसाप्पा अंकुश (अपक्ष) – 358
13) संजय आंबादास कांबळे (अपक्ष) – 353
14) नोटा  – 904

Visit : Policenama.com