राहुल माने टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगलीतील सराईत गुन्हेगार राहुल माने टोळीवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांना पाठविण्यात आला होता. त्याला मंजूरी देण्यात आली. ही टोळी २०१३ पासून कार्यरत असून या टोळीवर विविध पोलीस ठाण्यात १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

राहुल सुभाष माने (वय २४), पिल्या उर्फ महेश आनंद पारचे (वय २३), विक्की उर्फ शामराव भाऊसाहेब हजारे (वय २७), त्यागी उर्फ राहुल उर्फ प्रशांत पंकज भगत (वय २०), सचिन महादेव माने आणि प्रकाश बाबुराव जहान्नावर ( रा. सर्व कुपवाड ) यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतील सदस्यांवर खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, चोरी, अपहरण आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हे केले आहेत.या टोळीविरोधात अक्षय जगताप (वय-२३ रा. बुधगाव) यांनी एप्रील २०१९ मध्ये ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली होती.
Mahesh Parche

Vikas Hajare

 

Prashant Bhagat

अक्षय जगताप हे २४ एप्रिल रोजी कवलापूर येथील उपहारगृहात जेवण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर अक्षय हे पान खाण्यासाठी पान टपरीवर गेले होते. त्यावेळी राहुल माने याच्यासह टोळीतील इतर सदस्य त्याठिकाणी थांबले होते. अक्षयने त्यांना बाजूला होण्यास सांगितले. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पान घेतल्यानंतर अक्षय त्याच्या गाडीकडे जात असताना राहुलने अक्षला धक्का मारला. यावरुन त्यांच्यामध्ये वाद होऊन राहुल माने आणि त्याच्या इतर सदस्यांनी अक्षला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अक्षचा मित्र अवधुत जाधव हा भांडण सोडवण्यासाठी आला असता पक्या जहान्नावर याने त्याच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. तसेच पिल्या पारचेने अक्षयवर चाकुने सपासप वार केले. या घटनेनंतर अक्षने ग्रामीण पोलीस ठाण्यात राहुल माने आणि त्याच्या इतर साथिदारांविरुद्ध फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपसिंह गील करीत आहेत.

राहुल माने टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांना पाठविण्यात आला होता. त्याला मंजूरी देण्यात आली. ही कारवाई पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधिक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक श्रीकांत पिंगळे, संदिप कोळेकर, सिध्दाप्पा रुपनर, प्रवीण वाघमोडे, विशाल भिसे, दिपक गट्टे यांनी सहभाग घेतला.

सिनेजगत

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

 

You might also like