‘आशिकी’ फेम राहुल रॉय ‘या’ सिनेमातून करणार ‘कमबॅक’, शुटींगला सुरुवात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – १९९० साली रिलीज झालेला आशिकी हा सिनेमा आजही सर्वांच्या स्मरणात आहे. यातील एव्हरग्रीन गाणे चाहते आजही गुणगुणतात. या सिनेमाला आणि यातील गाण्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. तुम्हाला माहितीच असेल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच हा सिनेमा प्रेमात पाडेल असाच काहीसा हा सिनेमा आहे. या सिनेमातील अभिनेता राहुल रॉयवर त्या काळी अनेक मुली फिदा होत्या. राहुल रॉय या सिनेमात लिड रोलमध्ये होता. सध्या राहुल रॉय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्वचितच कोणाला माहिती असेल परंतु आशिकी या सिनेमातून राहुल रॉयने बॉलिवूड डेब्यू केला होता.

image.png

आशिकी सिनेमाने राहुल रॉयला रातोरात स्टार बनवलं होतं. आशिकी या सिनेमातून डेब्यू केल्यानंतर राहुल रॉयने अनेक सिनेमात काम केलं. पंरतु राहुलला यानंतर म्हणावं तितकं यश मिळालं नाही. राहुल रॉय पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण असं की, लवकरच राहुल बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. आशिकीमधील राहुलच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे यात मात्र शंका नाही.

image.png
राहुलच्या कमबॅक करणार असलेल्या त्याच्या आगामी सिनेमाची शुटींग सुरु झाली. ‘आगरा’ या सिनेमातून राहुल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कनु बहल हे या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाची शुटींग आग्रा आणि त्याच्या जवळपासच्या भागात होणार आहे. या सिनेमात राहुलसोबत इतरही अ‍ॅक्टर्स असणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त