राजस्थानात सत्तेचा पेच ; राहुल गांधींनी केले ट्विट 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१४ साल पासून सततच्या प्रभावाने खचलेल्या काँग्रेस पक्षाला आता सत्तेची हिरवळ बघायला मिळाली आहे असे असताना त्यांच्या नेता निवडीच्या प्रश्नाचे उत्तर आता त्यांनाच देता येत नाही कारण ज्योतीरादित्य शिंदे यांना कसबस शांत बसवण्यात काँग्रेसला यश आले असताना आता राजस्थानात हि मध्यप्रदेशा प्रमाणे मोठा पेच निर्माण झाला आहे.अशोक गेहलोत कि सचिन पायलट असा प्रश्न भेडसावत असल्याने सध्या राहुल गांधी यांच्या घरी मुख्यमंत्री निवडीची खलबते कुटली जात आहेत.

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी चांगलीच रस्सी खेच सुरु असून मुख्यंमत्री पद मिळवण्यासाठी मागील दोन दिवसात नाट्यमय हालचालींचा सामना सुरु आहे. काल गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या चर्चेत अशोक गेहलोत यांचे नाव पुढे आले तेव्हा सचिन पायलट नाराज झाले त्यामुळे आज पुन्हा चर्चेचा काथ्या कुटला जात आहे. राहुल गांधी यांच्या दिल्लीतील घरी या सगळ्या घडामोडी सुरु असून राहुल गांधी जो निर्णय घेतील तो सर्व काँग्रेसी नेत्यांना मान्य करावा लागेल असे एका काँग्रेसच्या नेत्याने नाव उघड नकरण्याच्या सबबीवर सांगितले आहे.

राजस्थानच्या काँग्रेस प्रभारी पदी असणारे केंद्रीय निरीक्षक के. सी. वेणुगोपाल यांनी राहुल गांधी मुख्यमंत्री पदाचा निर्णय लवकरच घेतील आणि त्यानंतरच हा पेच सुटू शकतो असे म्हणले होते. परंतु येत्या नजीकच्या काळात  हा प्रश्न सोडवण्याची निकड असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून सचिन पायलट मुख्यमंत्री पदासाठी खूपच आग्रही झाले आहेत असे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे.

राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट हे  अशोक गेहलोत यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यासाठी कदापी तयार नाहीत त्यांना स्वतःला हि मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागल्याने त्यांनी अशोक गहलोत यांच्या नावासाठी विरोध केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या समोर मुख्यमंत्री नेमण्याच्या प्रश्नावर मोठा पेच पडला आहे.

दरम्यान राहुल गांधी यांनी आपला पक्ष राजस्थान मध्ये मजबूत असल्याचे ट्विट करून सर्वांना चर्चेला विषयच दिला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हॅन्डल वरून ‘युनिटेड कलर्स ऑफ राजस्थान’ अशा कॅप्शन खाली उजवी कडून अशोक गेहलोत आणि डावी कडून सचिन पायलट उभे असणारा स्वतःचा फोटो पोस्ट करून चर्चेची राळ उडवून दिली आहे. राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार हा मोठा प्रश्न असला तरी तो सोडवावा लागणार कारण प्रश्न सुटला नाही तर लोक आणि विरोधक टीकेला सुरुवात करतील. राजस्थानच्या सामान्य जनात आपल्या राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार या बद्दल प्रचंड उत्सुकता आहे ती उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

Loading...
You might also like