वर्षभरासाठी काँग्रेसचं अध्यक्ष पद सोडून राहूल गांधी ‘हे’ काम करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागल्याने राहुल गांधींनी आपला काँग्रेसचा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधीला सल्ला दिला की काँग्रेस संकटात असताना असा कोणताही निर्णय घेऊ नये. परंतू राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना सांगितले नव्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु करा आणि ते पक्षाचे अध्यक्ष न राहता पक्षासाठी काम करतील. परंतू त्यावर आता तोडगा निघाल्याचे कळते आहे.

देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधणार –

या तोडग्यानुसार, राहुल गांधी पुढील १ ते दीड वर्षासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष पदापासून दूर राहतील. सांगण्यात येत आहे की काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी हा मार्ग काढाला आहे. याकाळात राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी न राहता संपुर्ण देशात फिरुन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यामुळे लवकरच काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी काँग्रेस कार्यसमिती बैठक घेऊ शकते.

नवा अध्यक्ष शोधण्याची जबाबदारी अहमद पटेल आणि गुलाम नबी आजाद यांच्यावर –

गांधी परिवारांशी जवळीक असलेल्या दोन नेत्यांना म्हणजेच अहमद पटेल आणि गुलाम नबी आजाद यांना नव्या अध्यक्षाला शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासंदर्भात या दोन्ही नेत्यांनी दक्षिण भारतात काही वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला, परंतू सांगण्यात येत आहे की राहुल गांधी असताना अध्यक्ष बनण्यासाठी कोणी नेता तयार नाही. अशी देखील माहिती मिळत आहे की, हिंदी पट्ट्यातील एखाद्या वरिष्ठ नेत्याला काँग्रेसचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. याआधी मागील लोकसभेला काँग्रेस नेता मल्लिकार्जुन खरगे, सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार, अशोक गहलोत व अन्य काही नेत्यांची अध्यक्षपदासाठी नावे चर्चेत होती.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com) 

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

घरगुती पद्धतीने ‘वजन’ करा झटपट कमी

त्याचा धडावेगळा झालेला हात, आता पुन्हा हालचाल करतोय

रक्तदानामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य राहते चांगले

हे पदार्थ खा राहाल कायम ‘हेल्दी’

You might also like