राहुल चा राग अन मोदींबद्दल प्रेम, विचार जुळले आणि केलं होतं लग्न पण….. 

पोलीसनामा ऑनलाईन – नरेंद्र मोदींचे समर्थक यांचा राजकारणी म्हणून तिरस्कार किंवा द्वेष करणारे खूप असतील पण माणूस एक प्रतिमा म्हणून त्यांच्यावर प्रेम करणारे खूप आहेत, आणि ते त्यांच्यासाठी काहीही करू शकतात, याचंच उदाहरण म्हणजे त्यांच्या विचाराचे दोन जण एकत्र आले आणि त्या मुला मुलीने लग्न हि केलं.

‘लव्ह अ‍ॅट फेसबुक कमेंट’च्या माध्यमातून एकत्र आल्याचे सांगणार्‍या गुजरातमधील जय दवे आणि अल्पिका पांडे ही जोडी आता वेगळी होण्याच्या विचारात आहे. दोघांची लव्हस्टोरी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. मात्र, अल्पवधीत अल्पिता हिने पतीवर गंभीर आरोप केले आहे. पती शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे आरोप अल्पिताने केले आहेत.

जय आणि अल्पिता हे दोघे नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सोशल मीडियावर ट्रोल करता जय आणि अल्पिताचे प्रेम जुळले होते. नंतर दोघे 31 डिसेंबर 2018 ला विवाहाच्या बंधनात अडकले होते. मात्र, या दाम्पत्याच्या नात्यात आता दुरावा निर्माण झाला आहे. जय हा गुजरातमधील जामनगरचा रहिवासी आहे.

मी बाथरुममध्ये काय करते हे देखील सांगावं लागतं- अल्पिता
विवाहाच्या अवघ्या एका महिन्यात अल्पिता पांडे हिने ट्विटरच्या माध्यमातून पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहे. पती शिवीगाळ करतो. तसेच शारीरिक आणि मानसिक छळ करतो, असा आरोप अल्पिताने केला आहे.

जय मला घरातून बाहेर पडण्याचीही परवानगी देत नाही. माझ्यावर कायम संशय घेतो. एवढेच नाही तर मी बाथरुममध्ये काय करते, हे देखील त्यांना सांगावे लागतले. माझा फोन हिसकावून घेतला जातो. जयचे माझ्यावर खरंच प्रेम होते की, त्याने केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी लग्न केले याबाबत आता मला शंका येत आहे.एखादा मोदी भक्त भक्तीच्या नावाखाली पत्नीशी असेच वागतो का ?, असा सवाल अल्पिताने उपस्थित केला आहे.

You might also like