पुण्यात जून अखेरीस राहुल गांधींच्या दोन सभा होणार : रमेश बागवे

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे चांगले काम चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर जून अखेर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची पुणे शहरात आणि ग्रामीण भागात मिळून दोन सभा होणार आहे.अशी माहिती काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले की,केंद्र सरकारच्या कामकाजावर सर्व सामान्य नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पाहण्यास मिळत आहे.दिवसेंदिवस महागाई वाढताना दिसत असून त्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरत आहे. नागरिकांमध्ये प्रबोधनाचे काम करत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या नागरिक,कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी जून अखेर राहुल गांधी यांच्या दोन सभा होणार आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.