‘स्पा सेंटर’मध्ये चालू असलेल्या हायप्रोफाईल ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 10 तरूणांसह 9 तरूणी ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीच्या जवळच असलेल्या गाजियाबादमध्ये 3 स्पा सेंटर्सवर पोलिसांनी छापा मारला, या छाप्यात पोलिसांकडून 19 जणांना ताब्यात घेण्यात आले. शनिवारी रात्री उशीरा इंदिरापुरम पोलीस ठाण्याला मिळालेल्या महितीनुसार या भागातील काही स्पा सेंटर्स अवैध पद्धतीनी चालवले जात होते. येवढेच नाही तर या स्पा सेंटरच्या आड सेक्स रॅकेट सुरु होते.

इंदिरापुरमचे एसओने एक टीम तयार करुन त्या भागातील 3 स्पा सेंटर्सवर छापा टाकण्यात आला. पोलिसांना मिळालेली माहिती खरी होती की या भागात असलेल्या स्पा सेंंटरमध्ये सेक्स रॅकेट चालवण्यात येत आहे. या विविध स्पा सेंटरमधून 10 तरुण आणि 9 तरुणींना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.

स्पा सेंटरवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी अनेक मोबाइल, काही औषधे जप्त केली. पोलिसांनी स्पा सेंटरमधून एक रजिस्टर देखील जप्त केले. ज्याचा तपास सुरु आहे. रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलेल्या 10 तरुणांची आणि 9 तरुणींची पोलीस तपास करत आहे तसेच तीन स्पा सेेंटर सील करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या या आरोपींना लवकरच न्यायालयासमोर नेण्यात येईल.

Visit : Policenama.com