आठवड्यात डझनभर दूध डेअर्‍यांवर ‘धाडसत्र’, धक्‍कादायक माहिती ‘उजेडात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील एका दूध डेयरीवर छापा टाकल्यानंतर पोलीस देखील हैराण झाले. या छाप्यांमुळे पोलिसांनी या दूध निर्मात्यांची पोलखोल करून हजारो जणांचे प्राण वाचवले आहेत. याठिकाणी केमिकल मिश्रित दूध बनवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून या प्रकरणाची भांडेफोड केली आहे. जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी धाड टाकल्यानंतर त्यांना ५० लाख रुपये किमतीचे सिंथेटिक दूध, केमिकल, ग्लूकोज पावडर आणि पामतेल जप्त केले आहे.

एक सप्ताह में एक दर्जन दूध डेयरी पर छापा, चौंकाने वाले खुलासे

या ठिकाणी प्रशासनाने धाड टाकताच दूध डेयरीचा संचालक फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी या संचालकाला आणि लॅब टेक्निशियनला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यांनी केमिकलयुक्त दूध निर्माण करत असल्याची कबुली दिली आहे. याठिकाणी धाड टाकल्यानंतर प्रशासनाला या ठिकाणी सिंथेटिक दूध, केमिकल, ग्लूकोज पावडर आणि पामतेलाबरोबरच हायड्रोजन पॅराऑक्साइड, कास्टिक सोडा आणि कपडे धुण्यासाठी वापरला जाणारा शाम्पू देखील मिळाला. मध्यप्रदेशाबरोबरच राजस्थान, उत्तर प्रदेशमधील देखील अनेक जिल्ह्यांत हे भेसळयुक्त दुध विक्रीसाठी पाठवत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

एक सप्ताह में एक दर्जन दूध डेयरी पर छापा, चौंकाने वाले खुलासे

दरम्यान, मुरेनाच्या जिल्हाधिकारी प्रियांका दास यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हि धाड टाकण्यात आली होती. यावेळी एसटीएफ दल, पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनेचे कर्मचारी देखील कारवाईत सहभागी होते.

एक सप्ताह में एक दर्जन दूध डेयरी पर छापा, चौंकाने वाले खुलासे

आरोग्यविषयक वृत्त –