‘या’ माजी मंत्र्याच्या घरावर इनकम टॅक्सची धाड  

डीग्रस : पोलीसनामा ऑनलाईन – माजी क्रीडा राज्यमंत्री आणि भाजप नेते संजय देशमुख यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारल्याची माहिती मिळते आहे. संबंधित विभागाचे आणि इतर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अशा जवळपास वीस जणांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान हा छापा नेमक्या कोणत्या प्रकरणात किंवा कोणत्या करणामुळे टाकण्यात आला आहे याची माहिती अद्याप मिळाली नाही.

जोपर्यंत पथकाचा तपास पूर्ण होता नाही, तोपर्यंत कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याकडून मिळाली आहे. दरम्यान या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. संजय देशमुख हे काँग्रेस सरकारमध्ये असताना क्रीडा राज्यमंत्री होते. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. सध्या ते भाजपात आहेत.