धुळे : जुगार अड्ड्यावर छापा, 8 जणांना बेड्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील चंद्रलोक हाॅटेलच्या तळजमल्यात जुगार खेळणाऱ्या आठ जणांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ते सर्वजण पत्याचा जुगार खेळत होते. जुगारींच्या ताब्यातून रोख रकमेसह 22 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लोहार गल्ली परिसरातील चंद्रलोक हॉटेलच्या तळमजल्यात 52 पत्त्यांचा खेळ पैसे लावून खेळत असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना खबरी मार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी एक पोलीस पथक तयार करुन गल्ली चंद्रलोक हॉटेल येथील तळ मजल्यात जुगार खेळणाऱ्या आठ जाणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह 22 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे –
1) सचिन रमेश माडगूळकर (वय 29 रा. शिवाजी नगर झोपडपट्टी, धुळे)
2) प्रवीण दिलीप पाटील (रा. वडजई ता.जि.धुळे)
3) इस्माईल शेख अकबर (वय 52, रा. वडजई रोड मुन्सिपल कॉलनी, धुळे)
4) जाकीर असे पिंजारी (वय .34, रा. हजार खोली सार्वजनिक हॉस्पिटल, धुळे)
5) सुनिल किसनचंद अहुजा (वय 57, रा. पद्मनाभ नगर साक्री रोड, धुळे)
6) मनोज मधुकर नेतकर (वय.37, रा. मनोर चित्र मंदिराच्या पाठीमागे अमर नगर धुळे)
7) युवराज दिलीप लिगाडे (वय.35, रा.मालेगावरोड धुळे)
8) आसिफ जीव दिन शेख (वय 32, रा. अकबर मशिद आझादनगर धुळे)
या आठ जणांना शहर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्‍वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचे पथकातील एएसआय हिरालाल बैरागी, एएसआय एन एम आखाडे, सतिष कोठावदे, मुक्तार मन्सुरी, भिकाजी पाटील, प्रकाश पाटील, प्रल्हाद वाघ, तुषार मोरे, अविनाश कराड, राहुल पाटील यांनी केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like