सांगली : जुगार अड्यावर छापा ; 10 जणांना अटक,16 लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – आटपाडी तालुक्यातील करगणी येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने जुगार अड्ड्यावर छापा टाकून १५लाख ७६हजार ७२०रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जुगार खेळणाऱ्या ११पैकी १० जणांना अटक करण्यात आली आहे.
Sangali-Gambling
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी पथके तयार केली आहेत. त्यांचे एक पथक करगणी परिसरात गस्त घालत होते. त्यांना करगणी परिसरात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.

करगणी पासून दोन किलोमीटर अंतरावर कारंडे वस्ती येथील अशोक कोंडीबा सरगर यांच्या घरात जुगार अड्डा सुरू होता. पथकाने या घरावर छापा टाकला असता त्या ठिकाणी तीन पानी पत्त्यांचा जुगार सुरू होता. त्यांनंतर पथकाने छापा टाकल्यावर जुगार खेळणाऱ्या ११ जणांपैकी एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला तर उर्वरित दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी अशोक सरगर, राजेश सूर्यवंशी, मधुकर खिलारी, छगन लांडगे, विजय शिंदे, सर्व रा. करगणी, आनंदा कदम, रा. तडवळे, संतोष गिड्डे, राहणार तडवले, पांडुरंग ढवळे, रा.बनपुरी, राजाराम पुकळे रा. बनपुरी, अण्णा पुकळे रा. आटपाडी यांना ताब्यात घेतले आहे. तर जमीर बादशाह मुल्ला पळून गेला आहे.
पोलिसांनी या ठिकाणाहून पत्त्यांची पाने, रोख रक्कम रुपये १७३७०, विविध कंपन्यांचे आठ मोबाईल, सहा मोटरसायकल, एक कार जप्त केली आहे. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त –