थेऊरफाटा येथील हुक्का पार्लरवर छापा; 6 जणांविरुद्ध FIR दाखल

थेऊर : पोलिसनामा ऑनलाईन – पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी गावच्या हद्दीत थेऊरफाटा येथे हॉटेल मॅजेस्टिक या नामांकित हॉटेलवर अवैध रीत्या चालू असलेल्या हुक्का पार्लरवर हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सई भोरे व त्यांच्या पथकाने धाड टाकून याप्रकरणी सहा जणांविरुद्ध सिगारेट व तंबाखू जन्य पदार्थ कायदा २००३ अंतर्गत लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सई भोरे व त्यांचे सहकारी पोलीस हवालदार महेबूब शेख, गुलाब वाल्हेकर, सुरेश कांबळे तसेच लोणी काळभोर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड, सुहास पवार या पथकासह पुणे सोलापूर महामार्गावर गस्त घालत होते त्यावेळी थेऊरफाटा येथील हॉटेल मॅजेस्टिक येथे अनेक जण गोळा झालेले दिसले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी जास्त असल्याने चौकशी करण्यासाठी त्यांनी आत प्रवेश केला तेथे पोहोचल्यावर एक वेटर पूर्वेकडील तळमजल्याकडे पळताना दिसला त्याचा पाठलाग केला तर तळमजल्यावर हुक्का पार्लरचे साहित्य आढळून आले.तेथे चार जण होते त्यामध्ये व्यवस्थापक लालचंद जयसिंग देशमुख व प्रवीण सदाशिव भागवत, पुंडलिक गाडेकर आणि गणेश गुंडाळे असे तीन वेटर होते त्यांच्याकडे हुक्का मालक व चालकाची चौकशी केली असता मालक हनुमंत भगवान तुपे आणि चालक सागर हनुमंत तुपे असल्याचे सांगितले. तेथील साहित्यात १२ पाँट किंमत रु. ४८०० , ३० हुक्का फ्लेवर किंमत रु. ३३,०००, १७ पाईप किंमत रु. ३४००, एक नवीन डंबू किंमत रु.९० तसेच चिलम, बेस, हुक्का, मशिन, पितळी भांडे, हुक्का कोळसा, फिल्टर असा एकुण रु. ४३,६४० चा मुद्देमाल जप्त करण्यात आले. पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक अनिल कोळेकर करीत आहेत.