शिक्रापुरात डीवायएसपीच्या पथकाकडून दारूधंद्यावर छापा

शिक्रापुर : प्रतिनिधी –   शिक्रापूर ता. शिरूर येथील एका हॉटेल मध्ये बेकायदेशीरपणे होत असलेल्या दारू विक्रीवर दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने कारवाई करत दारू जप्त करून दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला असल्याची घटना घडली आहे.

दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा शिक्रापूर येथील चाकण रोड जवळील हॉटेल साईकरुणा येथे बेकायदेशीरपणे विनापरवाना देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली, त्यांनतर दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा,दौंड कार्यालयातील नंदकुमार केकाण, ओव्हाळ यांच्या सह शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, महेंद्र शिंदे, निखील रावडे, आदींनी साई करुणा हॉटेल येथे जाऊन छापा टाकला .या वेळी हॉटेलमध्ये बसलेला इसम कावराबावरा होऊन पळून जाऊ लागला पोलिसांनी तात्काळ त्याला पकडले. यावेळी हॉटेलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या पाच हजार रुपये किमतीच्या दारूच्या बासष्ट बाटल्या जप्त केल्या आहे, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई निखील भिवाजी रावडे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी रामू बकाराम लांजेवार वय ५० वर्षे रा. शिक्रापूर चाकणरोड ता. शिरूर जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.लाॕकडाउन काळात शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे फौपावले असून वरिष्ठ अधिकारी येऊन कारवाई करतात माञ स्थानिक पोलिसांना हे का शक्य नाही अशा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.या बाबतीत बोलताना दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी सांगितले की आपल्या परिसरात कोठेही अवैध व्यवसाय सुरु असल्यास नागरिकांना पुढे येउन आम्हाला सांगावे.त्यावरील तात्काळ कारवाई केली जाइल