ब्यूटीपार्लरमध्ये चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूर शहरातील विश्वकर्मानगरीतील ब्यूटीपार्लर ॲण्ड स्पामध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी या ठिाकणी छापा टाकून महिला दलाल काजल कैथेल (वय-२२), अमोल मदामे (वय-४५) यांना अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि.५) रात्री करण्यात आली. आरोपींवर अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्‍वकर्मानगरात ‘ग्लोरी पार्लर ॲण्ड स्पा’ नावाने ब्यूटीपार्लर सुरू होते. काही दिवसांपासून येथे आंबटशौकिनांची गर्दी वाढली होती. अल्पवयीन मुलींसह युवतींची रेलचेल वाढली होती. त्यामुळे नागरिकांना संशय आल्याने त्यांनी पोलीस उपायुक्तांना याची माहिती दिली.
पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. ग्राहकाने अमोल मदामेची भेट घेऊन मसाजसाठी मुलगीची मागणी केली.

त्याने ग्राहकाला काजलकडे पाठविले. काजलने मुलगी देण्याचे मान्य करुन पाच हजार रुपयांची मागणी केली. पैसे घेतल्यानंतर काजलने एका मुलीला ग्राहकाच्या रुममध्ये पाठवले. ग्राहकाने सापळा रचून बसलेल्या पोलिसांना ईशारा करताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.

दरम्यान, या ठिकाणी बोर्ड लावण्यात आला होता. या बर्डवर काजलचा नंबर टाकण्यात आला होता. या बोर्डवर कॉल करा आणि मुलगी मिळवा अशी ऑफर देण्यात आली असल्याचे काही नागरिकांनी पोलिसांना सांगितले.