विद्रोही कवी वारवर राव यांच्या कन्येच्या घरीही छापे 

हैदराबाद : वृत्तसंस्था

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या विद्रोही कवी वरवरा राव यांच्या कन्येच्या घरीही पुणे पोलिसांनी छापे टाकले. पुणे आणि तेलंगणा पोलिसांच्या पथकाने सकाळी साडेआठपासून सायंकाळी साडेपाचपर्यंत ही कारवाई केली.

या छाप्यादरम्यान एका अधिकाऱ्याने वारवर राव यांची कन्या पवना हिला विचारलेल्या प्रश्नांबाबतही चीड व्यक्त होत आहे. पवना यांच्या घरी झडतीदरम्यान एका अधिकाऱ्याने पवना यांना विचारले की, ‘‘तुमचा पती दलित आहे, पण तुम्ही ब्राह्मण आहात. तरीही तुम्ही गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळी कुंकू का लावलेले नाही? पत्नीला शोभेल असा पारंपरिक पेहराव का केलेला नाही? का मुलीनेही वडिलांसारखेच असले पाहिजे? असे काही चीड आणणारे प्रश्न विचारले.

[amazon_link asins=’B01N2UQBLL,B01N9CEO0I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’90108243-ac1d-11e8-bed5-eff59673e26b’]

वारवर राव यांची कन्या पवना यांचा प्रा. के. सत्यनारायण यांच्याशी विवाह झाला आहे. सत्यनारायण हैदराबादमधील आंग्ल आणि परकीय भाषा विद्यापीठाच्या सांस्कृतिक अध्ययन विभागाचे प्रमुख आहेत.

या सर्व झडती व छापेमारी बद्दल प्रतिक्रिया देताना सत्यनारायण म्हणाले की, पुणे आणि तेलंगणा पोलिसांच्या पथकाने सकाळी साडेआठपासून सायंकाळी साडेपाचपर्यंत घरातील सर्व कपाटांतील सामानाची उलथापालथ केली. त्यांनी माझ्या पत्नीला अनेक बालिश आणि अवमानकारक प्रश्न विचारले.

तुमच्याकडे इतकी पुस्तकं का? चीनमध्ये छापलेली पुस्तकं का? माओ आणि मार्क्‍सची पुस्तक का आहेत? देवांच्या फोटो नाहीत, पण फुले-आंबेडकर यांच्या फोटो का आहेत, असे प्रश्नही पोलिसांनी विचारल्याचे सत्यनारायण यांनी सांगितले. मुख्य म्हणजे लाल रंगाचे मुखपृष्ठ असलेल्या प्रत्येक पुस्तकावरूनही चौकशी केली गेली. माझे माओवाद्यांशी संबंध असल्याचा पुरावा त्यांना हवा होता. हा सर्व अनुभव अपमानजनक होता.

जाहिरात