3 ‘स्पा सेंटर’वर छापे, 19 जणांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी नवी दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमधील 3 स्पा सेंटरवर पोलिसांनी एकाच वेळी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी तेथे सुरु असलेले सेक्स रॅकेट उघडकीस आणले असून तेथून 19 जणांना अटक केली आहे.

गायिझाबादमधील इंदिरापुरम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत काही स्पा सेंटर बेकायदेशीरपणे चालविली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालविले जात असल्याचीही माहिती पोलिसांना होती. त्यामुळे पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके तयार करुन रात्री या तीनही स्पा सेंटरवर छापे टाकले.

या स्पामध्ये मसाजच्या नावावर सेक्स रॅकेट सुरु होते. तेथून 9 तरुणी आणि 10 तरुणांना अटक करण्यात आली. या तीनही स्मा सेंटरला सील ठोकण्यात आले आहे.

Visit : Policenama.com