माओवाद्यांच्या थिंक टँकवर देशभरात छापे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी आज पहाटे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड येथे छापे घालून सर्च आॅपरेशन सुरु केले आहे.

त्यामध्ये वेरनोन गोन्झालविस, अरुण पाररिया (मुंबई),  वरावरा राव (हैदराबाद), सुधा भारद्वाज (छत्तीसगड) गौतम नवलाखा अशांच्या घरावर छापे टाकून झडती घेतली जात आहे़ पुणे पोलिसांनी या कारवाईला दुजोरा दिला असून सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले की, देशातील काही शहरांमध्ये पोलिसांनी सर्च सुरु केला आहे़ त्याबाबत मात्र त्याची माहिती अदया्प हाती आलेली नाही.

पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत माओवाद्यांनी पैसे पुरविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते़ या प्रकरणी पुणे पोलिसांनी यापूर्वी परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, अ‍ॅड़ सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांना अटक केली होती. एल्गार परिषदेला त्यांच्यामार्फत पैसा पुरविला गेला होता़ तसेच राजीव गांधीप्रमाणे एखाद्या मोठ्या नेत्याची हत्या करण्याबाबत त्यांच्यात ई मेलद्वारे माहिती दिली जात होती.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6d6929d4-aa89-11e8-9469-578bdd8efc94′]
त्यांच्याकडे सापडलेल्या सुमारे २०० ई मेलमध्ये या पाच जणांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे दिसून आले. वरावरा राव हे तेलंगणामधील नक्षलवाद्यांना सहानभुती असलेले प्रसिद्ध कवी आणि पत्रकार म्हणून ओळखले जातात.

पोलिसांनी  ई मेलची तपासणी करुन पोलिसांनी हैदराबाद, मुंबई, दिल्ली तसेच छत्तीसगडमध्ये या माओवादीचे थिंक टॅक असलेल्यांची माहिती घेतली. ते त्यांच्या घरी असल्याची माहिती झाल्यानंतर आज पहाटे एकाच वेळी किमान पाच ठिकाणी छापे घालून झडती घेण्याचे काम सुरु आहे.

माओवाद्यांशी संबंध असल्याने व एल्गार परिषदेशी संबंधित असलेल्यांना यापूर्वी अटक केली असली तरी आता ज्यांच्या घराची झडती घेतली जात आहे. त्यांची एल्गार परिषद अथवा कोरेगाव भीमा दंगलीशी संबंध नसून ते बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंधित असल्याचे उघड झाल्याने त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे असून ते स्वत: हैदराबाद येथे गेल्याचे समजते.

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे ७ बळी, २१ जणांना लागण