सचिन अंदुरेच्या तिघा मित्रांच्या घरावर छापे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपी सचिन अंदुरेची पोलीस कोठडी सीबीआयने घेतल्यानंतर त्याच्याकडील चौकशीला वेग आला असून मंगळवारी पहाटे सीबीआयने सचिन अंदुरे याच्या तिघा मित्रांच्या घरी छापे घातले आहेत.  सचिनचा चुलत भाऊ आणि मित्रांना ताब्यात घेतले आहे.

[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5738710f-a50b-11e8-b960-27c66409a87e’]

औरंगाबादमधील पैठण आणि देवळाली येथील सचिन अंदुरेचा चुलत भाऊ आणि मित्रांच्या घरी एटीएसच्या पथकाने  मंगळवारी पहाटे धाड टाकली. यावेळी त्यांच्याकडून काही स्फोटकांचा साठा जप्त केल्याचे समजते. तसेच, त्यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते.

नालासोपारा स्फोटकांचा तपास करत असताना तपास पथकाला संशयित शरद कळसकरचा जवळचा मित्र सचिन अंदुरेची माहिती मिळाली. त्या आधारे सचिनला अटक करण्यात आली आहे. सचिन औरंगाबादमध्ये एका दुकानात अकाऊंटंट म्हणून काम करत होता. सचिन अंदुरेनेच नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली, असा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे.