फार्महाऊसवर चालू असलेल्या ओल्या पार्टीत ‘हायफाय’ तरूणींचं ‘डांगडिंग’, 17 महिलांसह 50 जणांना पकडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातच्या सूरत येथील एका फार्म हाऊसवर छापा टाकून दारूच्या नशेत धुंद असणाऱ्या १७ महिलांसह ५० जणांना अटक करण्यात आली आहे. सुरतमधील डुमास रोडवरील फार्म हाऊसवर दारू पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून ५० जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या सर्व लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यादरम्यान, सर्वजण दारूच्या नशेत असल्याचे समोर आले.

गुजरातमध्ये दारू बंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे. पोलिसांनी या सर्वांना अटक करून गंभीर कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. छापा टाकून पोलिसांनी फार्म हाऊसमधून सात हजाराहून अधिक विदेशी दारू आणि १३ चारचाकी वाहन जप्त केले. लोकांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली असता ते दुमास पोलिस ठाण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबातील लोक पोलिस स्टेशनबाहेर रडताना दिसले.

नोटीस दिल्यानंतर मुलींना सोडण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार, २९ फेब्रुवारी रोजी आशीर्वाद फॉर्मवर लीप ईयर पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत काही महिलांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेले सर्व तरुण-तरुणी हे उच्चवर्गीय कुटुंबातील होते. लीप ईयर पार्टी दरम्यान प्रत्येकजण नशेत आढळून आले. पोलिसांनी श्वास विश्लेषक यंत्रातून त्यांची तपासणी केली. पोलिसांनी फार्म हाऊसवरून तब्बल तीन पेटी बिअर आणि वोडकाच्या बाटल्या देखील जप्त केल्या आहेत. दरम्यान नोटीस दिल्यानंतर मुलींना सोडण्यात आले आहे.