बारमध्ये १० रुपयाच्या ‘सिगारेट’मुळं वाद, ‘या’ माथेफिरूनं कापला चक्क वॉचमनचा ‘गळा’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – महाड तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली असून किरकोळ वादातून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. झालेला प्रकार असा की सिगारेटचे दहा रुपये देण्यावरुन वॉचमनसोबत आरोपीचा किरकोळ वाद झाला होता. या वादातून वॉचमनचा गळा कापण्यात आला आहे. हत्या करण्यात आलेला व्यक्ती हा एका बिअर शॉपीचा वॉचमन होता. वॉचमनचा गळा चिरणाऱ्या आरोपीचं धक्कादायक CCTV फुटेजही व्हायरल झालं आहे. ही खळबळजनक घटना महाड तालुक्यातील दासगाव भागात घडली आहे.

दासगाव येथील लीना कळमकर यांच्या देशी दारू आणि बिअर शॉपीमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या दिलीप साळवी यांची अशी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही हत्या करणाऱ्या माथेफिरू आरोपीचे नाव मयुरेश पड्याळ असे असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे हा आरोपी एक पुरुष असून देखील महिलेच्या वेशात होता. आणि वॉचमन झोपलेल्या अवस्थेत असतानाच त्याने त्याचा गळा चिरडला. घटनेच्या दिवशीच मयुरेशने बारमध्ये दारू घेतली होती आणि सिगारेट देखील घेतली परंतु सिगारेटचे पैसे त्याने काही दिले नव्हते. यातूनच त्याचं आणि बार मालकाचं भांडण झालं होतं.

दरम्यान हे भांडण चालू असतानाच बाहेरून वॉचमन आला आणि त्यानं मयुरेशला पैसे देण्यासाठी सांगितलं. याचाच राग मयुरेशला आला आणि त्याने कसलाही विचार न करता वॉचमनची हत्याच केली. अर्ध्या रात्री अडीच वाजेच्या सुमारास त्याने मुलीचे कपडे परिधान केले आणि कुणाला लक्षात येऊ नये म्हणून तोंडाला रुमाल देखील बांधला. बारच्या बाहेर झोपलेल्या वॉचमन जवळ मयुरेश गेला आणि धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. या भयानक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून या माथेफिरू आरोपीस अटक करण्यात आली आहे.

You might also like