रायगड / महाड : पोलीसनामा ऑनलाइन – रायगड जिल्ह्यातील (Raigad Crime) महाड तालुक्यातील आदीस्ते गावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) विद्यमान महिला सरपंचाचा (Female Sarpanch) रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून (Found Dead Body) आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मीनाक्षी खिडबीडे (Meenakshi Khidbeede) असे महिला सरपंचाचे नाव आहे. मीनाक्षी यांचा मृतदेह आज (सोमवार) दुपारी आदिस्ते (Adiste Mahad Taluka) परिसरातील जंगलात आढळला. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात (Raigad Crime) खळबळ उडाली आहे.
मीनाक्षी खिडबीडे या आदीस्ती गावच्या विद्यमान सरपंच आहेत. त्या आज सकाळी 11 च्या सुमारास चुलीसाठी लाकडे गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रस्त्यापासून सुमारे 100 मीटर अंतरावर मीनाक्षी यांचा मृतदेह गावातील एका व्यक्तीला दिसून आला. त्याने ही माहिती गावात सांगितली. (Raigad Crime)
गावातील पोलीस पाटील यांनी याची माहिती महाड तालुका पोलीस ठाण्यात (Mahad Taluka Police Station) दिली. घटनेची माहिती मिळताच महाड पोलिसांनी आदीस्ते गावात धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात (Government Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृत महिलेच्या डोक्यात लाकडाचा फटका मारला असून रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Raigad Crime | body female sarpanch ncp being found bloody Raigad
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update