रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – रायगड जिल्ह्याच्या कर्जत शहरातील रायगड जिल्हा बँकेला भीषण (Raigad District Bank Fire) आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्जत शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकातील श्री कपालेश्वर मंदिराच्या पहिल्या मजल्यावर ही बँक आहे. आज पहाटे चार ते पाचच्या दरम्यान हि आग (Raigad District Bank Fire) लागली आहे. हि आग ए वढी भीषण होती कि यामध्ये बँकेतील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. हि आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कर्जत नगरपरिषदेचे अग्निशमन दल, तसेच खोपोली येथील अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र कुलिंगचे काम अजूनही सुरु आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे (Raigad District Bank Fire) परिसरत खळबळ उडाली आहे.
आज पहाटे सगळे झोपेत असताना हि भीषण आग लागली. त्यामुळे कोणाच्याच ते लक्षात आले आहे नाही. जेव्हा सकाळी काही माणसे कामावर जात होती त्यावेळी त्यांच्या निदर्शनास हि गोष्ट आली आणि त्यांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
यादरम्यान हि संपूर्ण बँक जळून खाक झाली आहे.
हि आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Web Title :- Raigad District Bank Fire | raigad district banks karjat branch caught fire early morning fire live video
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Solapur Crime News | पांगरी स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी नाना पाटेकरला तमिळनाडूमधून अटक
- Chandrashekhar Bawankule | ‘राज्यातील पोटनिवडणुका बिनविरोधाची परंपरा ‘या’ नेत्यांनी जपावी..;’
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सर्वपक्षीय नेत्यांना साद - Pune Crime News | पुणे विद्यार्थी गृहात गोंधळ घातल्याप्रकरणी 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल