Raigad landslide | रायगडमध्ये बचावकार्य सुरु ! आतापर्यंत 44 मृतदेह ढिगाऱ्यातून काढले, 50 पेक्षा अधिक माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच?

महाड न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Raigad landslide | कोकणातील अतिवृष्टीचा (Konkan heavy rain) मोठा फटका रायगड जिल्ह्याला (Raigad district) बसला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड (Mahad) व पोलादपूरसह (Poladpur) सहा ठिकाणी दरडी कोसळण्याच्या (Raigad landslide) घटना घडल्या आहेत. पावासाने थोडी उसंत घेतल्याने मदतकार्याला जोर आला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांना आता बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे. आतापर्यंत 44 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले (44 bodies retrieved from the debris) असून, तब्बल 50 पेक्षा अधिक माणसं अजूनही ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.(50 more people are feared trapped under the debris)

मागील आठवड्यापासून राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुसळधार पावसाचा अनेक जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. कोकणावर तर पुराचं संकटच ओढवलं.
संततधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळये गावावर दरड कोसळली.
गुरुवारी झालेली ही दुर्घटना शुक्रवारी समोर आली.
प्रचंड पाऊस आणि विविध भागांचा तुटलेला संपर्क यामुळे वेळेत मदत पोहचू शकली नाही.
यामुळे या ठिकाणी प्रचंड जीवितहानी झाली.

रायगड जिल्ह्यात इतर ठिकाणी ही दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
दरड कोसळलेल्या ठिकाणी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. मदतीसाठी NDRF आणि लष्करालाही (Army) पाचारण करण्यात आलं आहे.
शनिवारी (दि.24) सकाळपर्यंत ढिगाऱ्याखालून 44 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
दोन ठिकाणाहून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी (Raigad District Collector, Nidhi Chaudhary) यांनी दिली.
तसेच 35 जखमी झालेल्या लोकांवर उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

एका ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरु आहे. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी असून, 50 पेक्षा अधिक लोकांचे मृतदेह ढिगाऱ्याखाली दबलेले असण्याची भीती प्रसासनाकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून बचावकार्याला वेग देण्यात येत आहे.

Web Title : Raigad landslide | mahad taliye latest news landslide and house collapses raigad ratnagiri mahad taliye rescue operations

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोनं पुन्हा 1000 रुपयांनी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Pune Rains | पुण्यात एकाच दिवसात 80 मिमीची ‘बरसात’ वडगाव शेरीत 100, गिरीवनला 149 मिमी पावसाची नोंद

RBI New Rules | आरबीआयने Personal Loan च्या नियमात केले अनेक बदल, जाणून घ्या आता किती घेऊ शकता कर्ज