Raigad Landslides | रायगड जिल्हयात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू, ढिगार्‍याखाली 30 हून अधिकजण अडकल्याची भीती – जिल्हाधिकारी निधी चौधरी

रायगड / महाड न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कोकणात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पुरस्थिती आहे. पुल खचणे, दरडी कोसळण्याच्या (Raigad Landslides ) घटना सातत्याने घडत आहेत. आता महाडमधील तळई गावात दरड कोसळून 32 तर साखर सुतारवाडी येथील चौघांचा जणांचा मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना (Raigad Landslides ) घडल्याने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. रायगड जिल्हयात दरड कोसळून तब्बल 36 जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यातील तळई गावात (landslides in Talai village of mahad, Raigad) काल दुपारी साडेचारच्या सुमारास दरड कोसळल्याने दरडीखाली गावातील 35 घरे गाडली गेली.
सर्वत्र मुसळधार पाऊस आणि पुराची स्थिती असल्याने प्रशासनाला आणि आपत्कालीन यंत्रणेला घटनास्थळी पोहचता आले नाही.
मात्र, स्थानिक ग्रामस्थांनीच मदतकार्य सुरू करून येथील गाडल्या गेलेल्या घरांमधून 32 मृतदेह बाहेर काढले. अजूनही 80 ते 90 मृतदेह मलब्याखाली गाडले असावेत अशी भीती व्यक्त केली जाते आहे.
आज दुपारी 12 वाजता मार्गातील अडथळे दूर करत मदतयंत्रणा घटनास्थळी पोहचली आहे.

रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे (Raigad District Superintendent of Police Ashok Dudhe) यांनी सांगितले की, घटनास्थळी एनडीआरएफ NDRF, पोलीस, स्थानिक प्रशासन आणि काही संस्थांची बचाव पथके पोहचली असून मदतकार्य वेगाने सुरू झाले आहे. जखमींना हेलीकॉप्टरने बाहेर काढण्यात येत आहे. तसेच महाड सावित्री पुरातील नागरिकांना एका हेलीकॉप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात येत आहे. एकुण स्थितीचे गांभीर्य पाहता आणखी तीन हेलीकॉप्टरची आवश्यकता आहे. यासाठी वरीष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे.

रायगडात एनडीआरएफच्या चार तुकड्या मदतकार्य करत आहेत. तळई येथे गुरुवारी सायंकाळी दरड कोसळली होती, परंतू पुराचे पाणी आणि मार्गावर दरडी पडल्याने रात्री येथे बचाव कार्यात अडथळे येत होते.
हे अडथळे दुर करुन आज दुपारी 12 वाजल्यापासून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने बचावासाठी लागणारे साहित्य, अन्न पाकीटे, पाणी यांची व्यवस्था ठेवली आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणंदनजीकच्या पोसरे बौद्धवाडीत
शुक्रवारी दरड कोसळून 17 जण मृत्युमुखी पडले.
यामुळे संपूर्ण कोकणात हाहाकार उडाला आहे.

रायगड जिल्हयात दरड कोसळून (landslides in Talai village of mahad, Raigad) तब्बल 36 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यापैकी 32 जण हे तळई येथील असून चार जण हे साखर सुतारवाडी येथील आहेत.
ढिगार्‍याखाली 30 जणांहून अधिक जण अडकल्याची भीती देखील रायगडच्या जिल्हाधिकारी
निधी चौधरी (raigad district collector nidhi choudhari) यांनी व्यक्त केली आहे.
मात्र, अजूनही 80 ते 90 मृतदेह मलब्याखाली गाडले असावेत अशी भीती व्यक्त केली जाते आहे.
तशी चर्चा आहे.

Web Title : Raigad Landslides | 36 killed many feared trapped under pile talai village mahad and Sakhar Sutar Wadi of raigad district

Gold Price Today | 10 ग्रॅम गोल्डच्या रेटमध्ये आज पुन्हा झाली घसरण, जाणून घ्या किती स्वस्त झाले सोने?

Kolhapur News | दुर्देवी ! ओढ्याच्या पुरातून जात असताना दुचाकी कलंडली, हवाई दलातील जवान गेला वाहून

Pune Rain | पुणे शहर आणि परिसरात आगामी 5 दिवसांमध्ये हलक्या स्वरुपाचा पावसाचा इशारा; घाट माथ्यावर मुसळधार