रायगडमध्ये राष्ट्रवादी पुन्हा… सुनील तटकरे २१ हजार मतांनी विजयी

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – रायगडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली आहे. सुनील तटकरे यांनी माजी केंद्रीय मंत्री व शिवसेनेचे उमेदवार अनंत गिते यांचा २१ हजार मतांनी पराभव केला आहे. सुनील तटकरे आणि अनंत गिते यांच्यात झालेल्या चुरशीची लढत झाली.

रायगड लोकसभा मतदार संघात यावेळी चुरशीची लढत झाली. या लढतीत सुनिल तटकरे यांनी बाजी मारली. या मतदार संघात  शिवसेनेकडून अनंत गीते ,वंचित बहुजन आघाडीकडून सुमन कोळी, राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात होते.  या लढतीत तटकरे हे 21 हजार मतांनी विजयी झाले. या मतदार संघात १६ लाख ५१ हजार ५६० मतदार आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेनेकडून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्या अटीतटीचा सामना झाला होता. शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते यांनी २११० या अल्प मताधिक्याने निवडून आले  होते. आता यंदा देखील रायगड लोकसभा मतदार संघात पुन्हा या दोघांमध्ये लढत झाली. मागील निडणुकीत शेकापने स्वतंत्र उभ्या केलेल्या उमेदवारामुळे गीतेंना लोकसभेची वाट सोपी झाली होती; परंतु शेकापचा लालबावटा आता तटकरेंच्या बाजूने उभा राहिल्याने गीतेंसमोर आव्हान उभे राहिल्याचे चित्र होते. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये जातीच्या समीकरणाचा विचार केल्यास मराठा, कुणबी, आगरी, कोळी, माळी, दलित, मुस्लीम या समाज घटकांचा प्रामुख्याने प्रभाव आहे. या मतदार संघात जरी शिवसेनेचा खासदार असला तरी या मतदार संघामध्ये शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्याने त्यांचा चांगलाच दबदबा निर्माण झाला होता.