Raigad News | रायगडचा स्वरूप शेळके अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम; 99.70% गुण

पेण : पोलीसनामा ऑनलाइन – Raigad News | रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील स्वरूप सुदर्शन शेळके (Swarup Sudarshan Shelke) या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदविका परीक्षेत ९९.७०% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे. लोणेरे येथील इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग ( बाटू ) या कॉलेज मधुन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या स्वरूप शेळके ह्या विद्यार्थीने पदविका परीक्षेत ९९.७०% मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावुन कॉलेजच्या नावाची प्रतिष्ठा अधिक प्रकाशमान केली आहे अशी प्रतिक्रिया बाटू कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. मधुकर दाभाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Raigad News)
कोणत्याही खाजगी कोचिंग क्लासेसला न जाता कॉलेज व्यतिरिक्त दिवसातून 3 ते 4 तास अभ्यास करून त्यानी हे यश मिळविल्याचे स्वरूप शेळके याने सांगितले. आपल्या यशात कॉलेजचे प्रिन्सिपल मधुकर दाभाडे, डॉ. नितीन लिंगायत, प्रोफेसर दीपिका शेट यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभल्याची प्रतिक्रिया स्वरूप शेळके याने दिली.
कॉलेजने मला संशोधनाकरिता पीएलसी लॅब उपलब्ध करून दिल्यानेच पीएलसी सिस्टीमवर आधारित स्वतंत्र प्रोग्राम तयार करण्यात मला यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे मी कॉलेजचा व कॉलेजच्या शिक्षकांचा आभारी आहे. भविष्यात पदवी अभ्यासक्रम करतानाच यूपीएससी परीक्षा देऊन देशाच्या प्रशासनात हातभार लावून देशसेवा करण्याचा मानस स्वरूप शेळके याने व्यक्त केला. (Raigad News)
कॉलेजमधील ९ विद्यार्थ्यांना काही विषय मागील सुमारे २ वर्षांपासून सोडविता आले नव्हते.
या विद्यार्थ्यांना स्वरूपने अभ्यासक्रम स्वतःच्या पद्धतीने शिकविला व अभ्यास करण्याची टेक्निकही शिकवली.
त्यामुळे स्वरूप ची अभ्यासाची रिविजन तर झालीच व या ९ विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त करता आले अशी माहिती स्वरूपची आई व नॅशनल कॉम्प्युटरच्या संचालीका स्मिता शेळके यांनी पत्रकारांना दिली.
स्वरूपने पदविका परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याने ज. का. ठाकूर मित्र परीवार मेढेखार,
आगरी समाजाच्यावतीने अध्यक्ष कैलास पिंगळे, धावेश्वर क्रीडा मंडळ सांबरी, पाटील परिवार सांबरी, शेळके परिवार,
नवतरुण नवरात्र मित्र मंडळ सांबरी यांनी स्वरूप शेळके याला सन्मानित केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Web Title :- Raigad News | Swaroop Shelke of Raigad stands first in the state in engineering degree examination; 99.70% marks
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bachchu Kadu | ‘आम्ही राजकारणात तडजोडी केल्याची किंमत भोगत आहोत’ – बच्चू कडू
BSNL चे जबरदस्त प्लान्स, कमी किमतीत लाँग व्हॅलिडिटीसह भरपूर डेटा आणि बरंच काही