रायगडमध्ये तथाकथित ‘रेव्ह’, हायप्रोफाईल ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश ; महिलांसह ९ जणांना अटक, ७ युवतींची सुटका

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – रायगड पोलिसांनी तथाकथित ‘रेव्ह’, हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई आज (शुक्रवारी) करण्यात आली असुन पोलिसांनी मांडवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अलिशान बंगल्यावर छापा टाकून 26 ग्रॅम कोकन जप्‍त केले आहे. याप्रकरणी काही महिला एजंटांसह एकुण 9 जणांना अटक करण्यात आली आहे तर 7 युवतींची सुटका करून त्यांना कर्जत येथील सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

राखी नोटानी, रंजिता सिंग उर्फ रेणू, राजकमल, निकेश मोदी, वरूण अदलखाँ, सईद अमीर रज्जाक, मिगा सिंग, श्रुती गावकर, आरोही सिंग यांच्याविरूध्द मांडवा पोलिस ठाण्यात गुरनं 29/2019 प्रमाणे अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम 4,5,6 सह भादंवि कलम 370 (1) (ब) याच्यासह एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट कलम 8 (क), 22, 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक देखील करण्यात आल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. अलिबाग शहरालगत समुद्र किनारा आणि अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. समुद्र किनारी असलेल्या बंगल्यामध्ये मुंबईतील बरेचजण बर्थडे तसेच इतर उत्सव साजरा करण्यासाठी येत असतात. मुंबई व शहरातील पिडीत तरूणींना बर्थडे पार्टीच्या नावाखाली सेक्स रॅकेटमध्ये ओढण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. एका अलिशान बंगल्याच्या वॉचमनकडून 2 मोबाईल नंबर मिळविण्यात आले. त्या नंबरवर संपर्क केला असता राखी नोटानी आणि रंजिता सिंग यांच्याशी संपर्क झाला. इतर बातचीत झाल्यानंतर पोलिसांनी डमी कस्टमरव्दारे छाप्याची तयारी सुरू केली.

पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर, अप्पर अधिक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक जमील शेख, सहाय्यक निरीक्षक मेघना बुरांडे, महिला उपनिरीक्षक बुरूंगळे आणि इतर 25 पोलिसांनी अलिशान बंगल्यावर छापा टाकला. बंगल्यात एकुण 26 ग्रॅम कोकेन आढळून आले. एकुण 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांनी कोकेनचे सेवन देखील केले होते. 9 जणांना अटक करण्यात आली असून बंगल्यातून 7 पिडीत युवतींची सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या युवतींची कर्जत येथील सुधारगृहात सुटका करण्यात आली आहे.

अटक केलेल्यांपैकी तसेच सुटका करण्यात आलेल्या काही युवतींचे बॉलिवूड आणि छोट्या पडद्याशी देखील कनेक्शन असल्याचे समजते. या तथाकथित ‘रेव्ह’ आणि हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये आणखी कोणा-कोणाचा समावेश आहे, मुंबईतून हे सेक्स आणि ड्रग्ज रॅकेट कोण चालवत होते, याचा रायगड पोलिस तपास करीत आहेत.

महिलांनी पालेभाज्या खाल्ल्या तर नेहमी राहतील फिट

वजन खूपच कमी आहे का ? मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर

नवाजुद्दीनच्या चित्रपटामध्ये मौनी रॉय ऐवजी येणार ही ‘अभिनेत्री’

‘धडकन’मधील ‘देव’ची मुलगी आथियाला स्टार क्रिकेटर केएल राहूल करतोय ‘डेट’

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like