सकारात्मक बातमी : ग्रामीण रुग्णालयात ‘कोरोना’ रुग्णावर यशस्वी उपचार

रायगड  : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. असे असताना रायगड जिल्ह्यातील महाडमधून एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. महाडच्या शासकिय रुग्णालयामध्ये एका कोरोनाग्रस्त परिचारीका रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. महाडसारख्या ग्रामीण भागात शासकिय रुग्णालयामध्ये उपचार करून तिचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर या परिचारिकेला रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.

महाडमधील कोकरे गावात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णावर या परिचारीकेने उपचार केले होते. त्यानंतर तिचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. उपचाराकरीता मुंबईला पाठवण्याऐवजी तिच्यावर महाडमध्येच उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाड ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी परिचारीकेवर महाडमध्ये उपचार करण्याचा निर्णय घेत तिच्यावर योग्य उपचार करून तिला कोरोनामुक्त केले.

या परिचारीकेला रविवारी रुग्णालयातून डिस्चार्जे देण्यात आला. महाड प्रेस असोसिएशन आणि ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या परिचारीकेवर पुष्पवृष्टी करत तिचे स्वागत केले. छोट्या शहरांमधून कोरोनावर उपचारासाठी रुग्ण मोठ्या शहरांमध्ये नेले जातात. असे असताना महाड सारख्या ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयामध्ये कोरोनाचा बरा झालेला हा पहिलाच रुग्ण आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like