Raigad Shivrajyabhishek Sohala | किल्ले रायगडावरील शिवराज्यभिषेक सोहळ्यामध्ये तटकरे नाराज, सोहळा अर्ध्यात सोडून माघारी

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – Raigad Shivrajyabhishek Sohala | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर (Raigad Fort) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सत्ताधारी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेही (NCP MP Sunil Tatkare) उपस्थित होते. मात्र, शिवराज्याभिषेक सोहळा (Raigad Shivrajyabhishek Sohala) अर्ध्यावर आला असताना तो सोडून सुनील तटकरे माघारी गेले.

रायगडावरुन खाली आल्यानंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाराजीचे कारण सांगितले. ते म्हणाले, हा कार्यक्रम राजकीय होता. राजशिष्टाचाराचे पालन केले गेले नाही. मला ते बोलू देतील असं वाटले होते. मी पालकमंत्र्यांना याबाबत सुरुवातीला म्हटले होते. कदाचित ते देखील हतबल असतील असे वाटते. आयोजनात अनेक त्रुटी राहिल्या. शिवराज्याभिषेक सोहळा (Raigad Shivrajyabhishek Sohala) आयोजित केला गेला याचे समाधान असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.

तटकरे पुढे म्हणाले, आज मी एक शिवभक्त नागरिक म्हणून इथे आलो होतो. शिवराज्याभिषेक सोहळा पूर्ण होईपर्यंत मी शिवभक्त मावळा म्हणून उपस्थित होतो. पण नंतरचा कार्यक्रम जरा राजकीय होता. मी या विभागाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतो. एक शिवभक्त म्हणून माझ्या भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्याची राजशिष्टाचारानुसार असणारी माझी संधी का डवलली गेली? मला माहित नाही. त्यामुळे पुढचा कार्यक्रम राजकीय विचारांचा असेल असं समजून मी तिथून निघालो. एक शिवभक्त म्हणून तिथे झालेल्या ऐतिहासिक सोहळ्याला मी उपस्थित होतो, असेही तटकरे म्हणाले.

हा सोहळा राजकीय नव्हता – केसरकर

यावर मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या
शिवराज्याभिषेकाचा सोहळा आहे, त्यात कोणी मानापमानाने येऊ नये. तटकरे हे ज्येष्ठ नेते आहेत.
पवारांनी (Sharad Pawar) त्यांना थोडे मार्गदर्शन करावे असे मला वाटते.
हा सोहळा राजकीय नव्हता, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis), खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale), मनसे प्रमुख राज ठाकरे
(MNS Chief Raj Thackeray), सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar),
पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह लोकप्रतिनीधी
आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title : Raigad Shivrajyabhishek Sohala | ncp mp sunil tatkare upset at the shiv rajyabhisek ceremony of shivaji maharaj at raigad left immediately

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून शिवप्रेमींना मोठी भेट, किल्ले रायगडावरुन तीन मोठ्या घोषणा (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | ‘शिवराज्याभिषेक’ दिनाचे औचित्य साधून देवेंद्र फडणवीसांची केंद्र सरकारकडे मोठी मागणी, म्हणाले… (व्हिडिओ)

ACB Trap News | Anti Corruption Bureau : 10 हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात