Raigad Shivrajyabhishek Sohala | ‘अमोल मिटकरी यांच्यात हिंमत असेल, तर उद्धव ठाकरेंना…’, नितेश राणेंचे आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raigad Shivrajyabhishek Sohala | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा शिवराज्याभिषेक सोहळा (Raigad Shivrajyabhishek Sohala) गुरुवारी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी टिका केली आहे. छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे सनातनी नव्हतं. ते रयतेच स्वराज्य होतं! तुम्ही परत परत चुक करताय. तुमचा टकमकी वरून लवकरच जनता कडेलोट करेल, असा इशारा मिटकरी यांनी राज्य सरकारला (State Government) दिला आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
ट्वीट करत मिटकरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा (Raigad Shivrajyabhishek Sohala) सनातन धर्म (Sanatana Dharma) प्रचारासाठी होता का? छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे सनातनी नव्हतं. ते रयतेच स्वराज्य होतं! तुम्ही परत परत चुक करताय. तुमचा टकमकी वरून लवकरच जनता कडेलोट करेल.
तुम्ही रायगडाच्या पवित्र भुमित सनातनी सत्तेचा…
ज्या सनातनी प्रवृत्तीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला त्यांनाच डोक्यावर घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करुन तिथीनुसार हा कार्यक्रम राबवलाय. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता याचं चोख उत्तर देईल. तुम्ही रायगडाच्या पवित्र भुमित सनातनी सत्तेचा उन्माद केलाय, अशी टीका मिटकरी यांनी राज्य सरकारवर केली आहे. याला भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना…
नितेश राणे म्हणाले, अमोल मिटकरी हे पार लहान आहेत. कारण ते चेकशिवाय बोलत नाहीत. मला याचा अनुभव आहे. अमोल मिटकरी यांच्यात हिंमत असेल, तर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जाऊन सांगाव की, एकच शिवजयंती साजरी करावी. मग पुढचा चेक माझ्या नावाने देतो. माझा चेक क्लीअर होतो, बाउन्स होत नाही, असा टोली राणे यांनी लगावला.
अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर
नितेश राणेंच्या टीकेला मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर सनातन्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला का विरोध केला? शिवाजी महाराजांना धर्म शुद्धीचा अधिकार नाही असे सनातन्यांनी का म्हटले? व गागाभट्टाला काशीवरून का बोलावले? या प्रश्नाचे उत्तर तेवढे दे माझाही बाउन्स न होणारा चेक तुला देतो.
Web Title : Raigad Shivrajyabhishek Sohala | nitesh rane challenge amol mitkari on uddhav thackeray say one date shivaji maharaj jayanti
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा